नाकाडोंगरी येथे प्याऊचे उद्घाटन

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालय येथे दि. ४ एप्रिल ला सर्व वनकर्मचारी यांच्या तर्फे सार्वजनिक प्याऊचे उदघाटन करण्यात आले. त्यासोबतच वनवणवा, अवैध शिकार याबाबत जनजागृती फलक लावण्यातआले. याप्रसंगी एम. डी. मोहिते वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थतीत शेखर कोतपल्लीवार उपसभापती पं. स. तुमसर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित डी. ई. यादव क्षेत्र सहाय्यक नाकडोंगरी, के,जी.नंदरधने वनरक्षक, कु.करिश्मा तुरकने कृषी तज्ञ पाणलोट समिती, एस. एच. भेंडारकर वाहन चालक, रामाजी गौपाले, प्रभुजी नेवारे, गणेश राऊत, नंदलाल नागपुरे, राजेश वाघमारे, श्यामजी मूर्खे, कलीम अन्सारी व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *