तीनवर्षांच्यानंतर शहरात गुढीउभारणी उत्सव थाटात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी लोटा चांदीचा,माळ सुगंधी उभारतो मराठी मनाची गुढीरचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, साधू संतांची पुण्याई नांदो सुख समृद्धी दारी,चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट,नवा आरंभ नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन, गुढीपाडव्याच्या हार्दिकशुभेच्छा, नूतनवर्षाभिनंदनासह मागील तीनवर्षापूर्वी कोरोनामुळे गुढीपाडवानिमित्ताने गुढीउभारणी कार्यक्रम घेण्यात आले नाही. यावर्षी महाराष्ट्र शासनाने कोरोना कमी असल्याने शिथिलता देण्यात आल्याने मोहाडी शहरात ठीकठिकाणी गुढीपाडवानिमित्ताने गुढीउभारणी करण्यात आले. यावर्षी भारतीय नवसंवत्सर २०८० शुभारंभ बुधवार दि.२२ मार्च २०२३ पासून सुरू झाले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कोणताही सण असो वा उत्सव येथे प्रत्येक उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यापैकीच एक सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याचे महत्त्व म्हणजे ही संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे.

ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असेही म्हटले जाते. या दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे अनेक जण नवा व्यापार किंवा एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी याच दिवशी करतात. गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये, म्हणून वर्षांच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत, असे सांगितले आहे.सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा,असे समजले जाते. गुढीपाडवा हा साडेतीन नववषार्ची सुरुवात होते. अनेक जण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी आपण सर्वांनी नकारात्मक विचार न आणता सकारात्मक विचार अंमलात आणण्याचा संकल्प करू या!

गुढी उभारणीचा हा सण सर्वांना आनंदाचा, सुखसमृद्धीचा जावो. सर्वांसाठी मंगलमय विचार मनात आणू या. कारण सध्याच्या आधुनिक शास्त्रानुसार हे सिद्ध झालंय की जेव्हा आपण नकारात्मक विचार मनात आणतो तेव्हा त्याचा सर्वांत प्रथम परिणाम होतो तो स्वत:वरच. त्यामुळे सतत सकारात्मक विचार असावेत व वागणेही त्याच दिशेने असावे. असे म्हणतात की अतिशय दु:खी असणाºया, सतत दु:खाला कवटाळत बसणाºया व्यक्तीच्या दारावर आलेले सुखही, ही व्यक्ती आपल्याकडे पाहात नाही म्हणून नाराज होऊन निघून जाते. हाच विचार यांच्या मनात रुजवणे आज काळाची गरज आहे. सकारात्मक विचारांची गुढी या व्यक्तींसाठीही उभारायची. तरच विचार बदलतील व अशी व्यक्ती बदलून जाईल. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नैराश्यात जाणारी आजची तरुण पिढी. खरे तर या सगळ्याच तरुणांच्या हाती एक एक सकारात्मकतेची गुढी द्यायला हवी. पालक-शिक्षक किंवा वयाने यांच्यापेक्षा थोडी मोठी असणारी व्यक्ती तरुण पिढीचं योग्य मार्गदर्शन करू शकते. कुणीही जरा काही बोलले, मनासारखी गोष्ट घडली नाही तर अगदी आत्महत्या करण्यापर्यंत मजल मारणाºया या पिढीला गरज आहे ती मायेच्या दोन शब्दांची, आपलेपणाची.

मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील रहिवासी नूतन गौरीशंकर बांडेबुचे यांनी कुटुंबातील सदस्यसह निवासस्थानी येथे गुढीपाडव्यानिमित्ताने गुढी उभारणी केली तर मोहाडी शहरात सोनार समाजातील ढोमणे कुटुंबातील प्रदीप ढोमणे व सौ.श्वेता ढोमणे या कुटुंबातील सदस्यांनी तीनवर्षापूर्वी खंड पडलेली गुढीपाडवानिमित्ताने गुढी उभारणी परंपरा जोपासली असल्याचे चित्र दिसून आले. हे विशेष. मुहूतापैर्की एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदू

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *