स्त्री हा कुटुंबाचा खरा कणा – विजयश्री वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : पूर्वी महिलांना फक्त चुल आणि मुल या पुरतेच मर्यादीत ठेवले जात होते मात्र व आजचे चित्र पुर्णपणे बदलले आहे. आजची स्त्री हि कुठेही कमी नाही. आज स्त्रीयांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटाविला आहे. आज सर्वत्र महिलांचा गौरव केला जात आहे. स्वत:चे कुटूंब सांभाळीत विविध क्षेत्रात काम करणाºया महिलांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आजची स्त्री ही कुटूंबाचा कणा आहे असे प्रतिपादन वाणी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा विजयश्रीताई चरण वाघमारे यांनी केले. विजयश्री चॅरिटेबल ट्रस्ट भंडारा जिल्हा आणि विकास फाउंडेशन भंडारा जिल्हा तर्फे तुमसर येथे आयोजित महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रम विजयश्रीताई चरण वाघमारे मार्गदर्शन करीत होत्या. विजयश्री वाघमारे पुढे म्हणाल्या की, जीवनसंघर्ष हा सर्वांच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात असून जेव्हा आ पण एकत्र येऊन त्यावर चर्चा करतो तेव्हा आपल्याला जगातील प्रत्यक्ष संघषार्ची जाणीव होते. आणि त्यातून आपले दु:ख इतरांपेक्षा कमी असल्याची जेव्हा जाणीव होते तेव्हाच आपण आपले दु:ख विसरून पुन्हा जीवनात संघर्ष करण्यासाठी जोमाने कामाला लागतो महिलांनी कुठल्याही संकटाला न घाब रता हिमतीने त्याला समोर जावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्र- संगी महिलांच्या विविध स्पर्धा व मनोरंजक खेळाचेही आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी ज्या महिला कुटुंबाचा मुख्य आधार बनून कुटुंबाचा गाडा हाकतात त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती महिलांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांना आलेल्या संकटांचे कथन केले. ते ऐकुणउपस्थितांना गहिवरून आले. कार्यक्रमाला तुमसर शहरातील हजारो महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास फाऊंडेशन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनलताई कारेमोरे, जिप सदस्या धुरपता मेहर,माजी जिप सदस्य राणीताई हेंग, पं.स.सदस्य पल्लवीताई कात्रे,सलोनीताई भोंडेकर, सुशिलाताई पटले, छायाताई तडस, दुर्गाताई बुराडे, कौतुकताई मंडलेकर, आशाताई लंजे,निशाताई उमाळे, निशाताई लंके, निशाणाताई व माजी नगरसेवक सेलोकर, विजयाताई चोपकर, महिला तालुकाध्यक्ष सीमाताई गौपाळे, बेबीताई बिसने, संताजी स्नेही मंडळ तुमसर अध्यक्षा स्नेहाताई शिवाजी भेलावे, मा. नगरसेवक पमाताई ठाकूर, सीमाताई भुरे, सरोजताई भुरे, वंदना आक्रे, जयश्री गभणे, किरणताई वाघमारे, शालू वहाणे, कल्याणी घीसानेकर वषार्ताई लांजेवार, निकिता री खंडाते, कविता भोंगाडे, शोभाताई भा मेश्राम, सुजाताई ठाकूर, दै.कारभारी, भोंगाताई भुरे, डॉ. , कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती ताई बिसने , सोनिताई लांजेवार ,प्रीती वे ताई भोयर , पिंकीताई बडवाईक , वैशाली बावनकर , नेहा मानापुरे , आणि रती रहांगडाले अवचट यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *