महिलांना अर्धी तिकीट,आॅटो चालकांचा संप

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी लाखनी :- शासनाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने खाजगी वाहतूक करणारे आॅटो चालक संपावर गेले आहेत त्यामुळे महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्याऐवजी सिलेंडर ५० टक्के स्वस्त करा अशा प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गतशासनाने एसटीने प्रवास करणाºया महिलांना ५० टक्के सवलत दिली असून त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करणाºया प्रवासांची संख्या अत्यल्प झाली आहे त्यामुळे खाजगी वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे अशातच सिलेंडरचे दर गगनाला भिडल्यामुळे प्रवासा त सवलत देण्यापेक्षा स्वयंपाक घरातील सिलेंडर ५० टक्के सवलतदिल्यास अधिक महिलांचा फायदा होईल अशा प्रतिक्रिया सध्या परिसरात उमटत आहेत.

प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे खाजगी वाहतूक करणाºया आॅटो चालकांचे संपावर जाणे सहाजिकच आहे त्यातच शासनाने महिला प्रवाशांचा प्रवासात ५० टक्के सूट दिल्यामुळे पुन्हा बेरोजगार असलेल्या आॅटो चालकमालकांवर अन्याय केल्यासारखे दिसून येत आहे त्यामुळे खरंच शासनाने महिला सक्षमीकरण अंतर्गत एस.टी. प्रवासातच सूट दिली की बेरोजगार खाजगी वाहन चालक असलेल्या आॅटो चालकांना संपुष्टात आणण्यासाठी ही योजना आखली हे न समजणारे कोडे आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले त्यातच अनेकांनी स्वत:च्या चरितार्थ चालविण्यासाठी खाजगी वाहन खरेदी करून त्यातून दिवसभर प्रवाशांना ने -आन करण्याचे परिश्रम करून आपला चरितार्थ चालवीत असतानाच शासनाने एसटी चे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आॅटो चालकांवर अन्याय केल्यासारखे दिसून येत आहे. त्यामुळे आॅटो चालकमालक संघटनेतर्फे दोन दिवसीय संपाचे आयोजन करण्यात आले त्या संपात आॅटो चालकांकडून प्रतिसादही चांगला मिळाला परिसरातील नागरिकांना आॅटो अभावी स्वत:च्या वाहनाने व एस टी बसने प्रवास करावा लागला .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.