दुकान गाळे वाटप प्रकरणी मंगळवारला आमरण उपोषण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : लाखनी तालुक्याच्या अंतर्गत पोहरा ग्रामपंचायत येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने हेतुपुरस्पर नियमाला डावलून दुकानगाळे वाटप केल्याची बाब यापूर्वी उघडकीस आली होती. ग्रामपंचायत पोहरा सरपंच रामलाल पाटणकर यांनी पदाचा दुरूपयोग करीत आपल्या मर्जीतील भूषण हरीदास बनकर यांना गाळेवाटप केले व दिव्यांग असलेल्या एकनाथ सोमा शिवणकर यांना डावलले. यासंबंधी ग्रामविकास अधिकारी नरहरी बारस्कर यांनीही सरपंचाला नियमांविषयी जागरूक न करता कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी गटविकास अधिकारी पं.स. लाखनी यांच्याकडे चौकशी करणेबाबत तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार यशवंत भाऊराव खेडीकर सदस्य ग्रामपंचायत पोहरा यांनी विषयाच्या अनुषंगाने दि.२१ नोव्हेंबर रोजी लाखनी येथे पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण करण्याचे निवेदन गटविकास अधिकारी लाखनी यांना दिले.

आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले, ग्रामविकास अधिकारी नरहरी बारस्कर यांनी दुकानगाळे वाटप प्रकरणी सरपंचाला कोणत्याही प्रकारचा अटकाव केला नाही. याविषयीची तक्रार ग्रामपंचायत सदस्य यशवंत भाऊराव खेडीकर यांनी २१ सप्टेंबर २०२३ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांना पोहरा येथील दुकानगाळे वाटपाची चौकशी करून, पदाचा दुरुपयोग करणाºया सरपंच रामलाल पाटणकर व कर्तव्यात कसूर करणाºया ग्रामविकास अधिकारी नरहरी बारस्कर यांचेवर कारवाही करण्यात यावे, अशी लेखी तक्रार केली होती. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्षित करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मंगळवारला पं. स. लाखनीच्या आवारात आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *