बोलेरोची बाईकला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : ब्रह्मपुरी येथून गणपतीचे दर्शन घेऊन गावाक- डे परत येत असताना लाखांदूर जवळील चप्राड पहाडी जवळ झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार ६ सप्टेंबर रोजी रात्री १० .३० वाजताच्या दरम्यान घडली . वक्की अरुण ठाकरे वय २५ वर्ष रा.आसोला ता.लाखांदूर असे मृतक युवकाचे नाव असून जयघोष अशोक मिसार वय २५ वर्ष रा.आसोला असे जखमी युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार,विक्की अरुण ठाकरे व जयघोष अरुण निसार हे दोघेही ब्रम्हपुरी येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित यात्रा बघण्यासाठी मंगळवार ला सायंकाळी आसोला वरून गेले होते.रात्री उशिरा पर्यंत ब्रम्हपुरी येथे गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे एम एच ४० बी ३५६१ या क्रमांकाच्या हिरो पॅशन मोटारसायकल ने परत येत असताना चप्राड पहाडी जवळ लाखांदूर वरून वडसा कडे जाणारी चारचाकी वाहन क्र.एम एच ४० ए.सी.१३६८ या बोलेरो वाहनाने जबर घडक दिली यात मोटारसायकलस्वार विक्की ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर जयघोष मीसार हा गंभीर जखमी झाला.विशेष म्हणजे अपघातातील चारचाकी वाहन पलटली असून गाडीच्या चालक वाहन सोडून पळाला .

अपघातानंतर जवळपास दीड तास अपघातग्रस्तांना कसलीच मदत न मिळाल्याने त्यांना रुग्णालयात जाण्यास विलंब झाला. चप्राड येथील काही नागरिकांनी जखमीला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला.ते घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला.पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.सध्या सणासुदीचे दिवस असून गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यात गणपती,दुर्गोत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असल्याने रात्री उशिरा पर्यंत साकोली ते वडसा मार्गावर वाहनांची भरघाव वेगाने वाहतूक सुरू झाली आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यात मृत्यूचे प्रमाण वाढत जात आहे.भरधाव वेगाने जाणाºया वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी सामान्य जनता करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *