सासºयाने कुºहाडीने केली सुनेची हत्या

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सासरा व सुनेतील भांडण इतके विकोपाला गेले की, सासºयाने रागाच्या भरात सुनेच्या मानेवर कुºहाडीचे वार घालून तिची हत्या केली. पिंकी सतीश ईश्वरकर (३०) असे मृत पावलेल्या सुनेचे नाव आहे. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे शुक्रवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. बळवंत रघुजी ईश्वरकर (५८, रोहणा) असे आरोपी सासºयाचे नाव आहे. मृत पिंकीला तीन वर्षाचा एक मुलगा असून आईच्या प्रेमाला मुकला आहे. बळवंत ईश्वरकर हा मुलगा सतीश व सून पिंकी ईश्वरकर व तीन वर्षांच्या नातवासोबत एकाच घरात राहयचे.

बळवंतच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. काही दिवसांपासून सासरा व सुनेत नेहमी भांडण होत असल्याचे शेजाºयांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळी पिंकी भांडी घासत असताना सासरा बळवंत याने मागेहूनयेऊन पिंकीच्या मानेवर कुºहाडीने वार केला. तशीच ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. यावेळी तिचा पती व मुलगा किराणा दुकानात गेले होते. बळवंत ईश्वरकरला अटक करण्यात आली आहे. भांडण कशावरून सुरू होते, सुनेची हत्या करण्यापर्यंत बळवंतने निर्णय का घेतला, हत्येचे नेमके कारण काय, या दिशेने मोहाडी पोलिस तपास करीत आहेत. पोलीसानी मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी रुग्णालयात पाठविले. सदर हत्या घरगुती भांडणातुन झाल्याची चर्चा गावात सुरू होती. मोहाडी पोलिसानी आरोपीला अटक केली असून भादंवी च्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप पुल्लरवार व त्यांची चमू करीत आहे.

स्वत:च गेला पोलिस ठाण्यात

सुनेवर कुºहाडीचे घाव घातल्यानंतर आरोपी बळवंत हा स्वत:च मोहाडी पोलिस ठाण्यात गेला. तसेच त्याने सुनेची हत्या केल्याची माहिती दिली. याचवेळी त्याला ताब्यात घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.