बि-हाडातील २ तरुणांचा बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका लाखनी : मासोळी पकडण्यासाठी मानेगाव शिवारातील गाव तलावात २ तरुण आपल्या वयस्क साथीदारासह गेले होते. मासोळी पकडताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची घटना आज मंगळवारी (ता. ०४) सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. बिरजूसिंग उदयसिंग चित्तोडीया वय २३ व क्रिष्णा रामसिंग चित्तोडीया वय १८ दोन्ही रा.आर्वी, जि.वर्धा. (हल्ली मुक्काम मानेगाव /सडक) असे मृतकांचे नाव आहे. मानेगाव /सडक शिवारात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आर्वी (जि. वर्धा) येथील ८-१० कुटुंबीय आपल्या बिºहाडासह काही दिवसांपूर्वी मानेगाव शिवारातील मोकळ्या जागेत आपल्या तंबूसह वास्त्यव्यास आले आहेत. दररोज आंघोळीसाठी गाव तलावात जात असल्याने त्यांना गाव तलावाची माहिती होती. आज मंगळवार लाखनी येथील आठवडी बाजार असल्याने तंबूतील काही लोक औषधी विक्रीसाठी गेले होते.
तर बिरजूसिंग व क्रिष्णा आपल्या तंबूवर होते. ते मासोळी पकडण्यासाठी गाव तलावात गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले हि बाब तिथेच असलेल्या एका वयस्काच्या लक्षात आली. त्याने आरडा ओरड केली बघता बघता बघ्यांची व गावकºयांची व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी जमा झाली. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे, सोनवणे पोलीस हवालदार निलेश रामटेके, गौरीशंकर कडव पोलीस शिपाई सुनील मेश्राम घटना स्थळी पोहचले उपस्थित नागरिकांच्या मदतीने नातेवाइकाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भुते यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत. मृतक बिरजूसिंग चे २ दिवसानंतर बिºहाडतच लग्न होणार होते. यामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *