मुलीला पळवुन नेणाºया युवकास २० वर्षाचा सश्रम कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अल्पवयीन मुलीला पळवुन नेल्याप्रकरणी भंडारा जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली. सुभाष देवनाथ भोवते वय २५ वर्षे रा. कलेवाडा ता. पवनी जि. भंडारा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मुलीचे वडील हे मजुरीचे काम करीत असुन त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी मोठी मुलगी ही इयत्ता १२ व्या वर्गात शिकत होती. त्याकरीता ती दररोज सकाळी ६.३० वा. ते दुपारी ०२.०० वा शाळेतुन घरी परत येत होती. दिनांक २३ सप्टेंबर २०२१ सदर घराबाहेर पडली सोबत तीने बॅग व पुस्तक घेतले. मात्र सायकांळ होवुनही अल्पवयीन मुलगी ही घरी परत न आल्याने घरच्यांनी तीचा गावात व मैत्रीणींकडे शोध घेतला मात्र ती कुठेच मिळुन आली नाही. दरम्यान तिच्या मैत्रीणीकडे विचारपुस केली असता, तिने सागीतले की,पिडीता ने पहेला येथे पानठेल्याजवळ सायकल ठेवुन पहेला इथुन अडयाळ येथे बसने गेली.
मुलगी घरी परत न आल्याने तिचे वडीलांनी दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी अड्याळ पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली. दरम्यान पोलीसांना पिडीत अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात यश आले. दिनांक ४ आॅक्टोंबर २०२१ रोजी पोलीस, पिडीताची आई यांचे समक्ष पिडीताचे बयाण नोंदविले असता. पिडीताने सांगीतले की, गुन्हयातील आरोपी सुभाष देवनाथ भोवते वय २५ वर्षे रा. कवलेवाडा याने पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असुन सुध्दा तीला प्रेमसंबधातुन पळवुन नेले होते. यावरुन अल्पवयीन मुलीचे वडीलांनी पोलीस स्टेशन अडयाळ येथे येवुन अपराध क्रमांक १८२/२१कलम ३६३,३७६ (२)(एन) भादवी सहकलम ४,६ पोक्सो कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील व सहायक पोलीस निरीक्ष्- केली. तपासाअंती आरोपी विरुध्द योग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपी विरुध्द विविध कलमांखाली गुन्हा नोंद करून आरोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर गुन्हयाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिष श्री. पी. बी. तिजारे यांचे न्यायालयीन कक्षात चालविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले.दरम्यान पुरावे व साक्षदार यांच्या आधारे आरोपीवरील दोष सिध्द झाल्याने न्यायालयाने दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी आरोपी सुभाष देवनाथ भोवते याला कलम सेक्षन ६ पोक्सो कायदा २०१२ अन्वये मध्ये २० वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रूपये दंड तसेच न कलम सेक्षन ४ पोक्सो कायदा २०१२ अन्वये मध्ये १० वर्षे सश्रम कारावास १ हजार रूपये दंड व द्रव्यदंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा , कलम ३६३ मध्ये १ वर्षे सश्रम कारावास ५०० रु. दंड व द्रव्यदंड न भरल्यास १ महिने साधा कारावास शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक भंडारा ईश्वर कातकडे, पोलीस उपअधिक्षक (गृह) विजय डोळस,अड्याळ पो.स्टे.ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक श्री. मिसाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुभाश रहागडांले बं. नं. ९४३, पोलीस नायक प्रमोद कमाने बं. नं. ११८१ यांनी योग्य पिडीता नेहमीप्रमाणे सकाळी ०६.३० वा. शाळेत जात असल्याचे सांगुन सायकलने पिडीत अल्पवयीन मुलगी मिळुन आल्याने महिला दक्षता समिती अध्यक्ष व महिला ाक भाग्यश्री कुलकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन तपासाला सुरुवात भरल्यास ३ महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली . वरील कलमा मध्ये पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज सांभाळले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.