आंबाडी ग्रामपंचायत च्या पुढाकाराने १५ वर्षाच्या लढाई नंतर शेतकºयांना मिळाला रस्ता

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : नजीकच्या आंबाडी, पालगाव, गिरोला गट ग्रामपंचायत अंतर्गत भंडारा पाऊनी रस्त्यावर स्थित आंबाडी ते पालगावं दरम्यान शेत शिवारातील शेतकºयांना शेतात कामासाठी एकही रस्ता नव्हता. त्यामुळे मागील १५ वर्षापासून शेतकºयांनी ग्रामपंचायत, तहसिलदार, सार्वजानिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासन विभागाला पाठपुरावा केला. अखेर ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती, पोलिस पाटील यांच्या पुढाकाराने पंधरा वर्षाच्या लढाई नंतर शेतकºयांना रस्ता मिळाल्याने न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. आंबाडी ग्रामपंचायत अंतर्गत आंबाडी, गिरोला, भिलेवाडा, माथाडी, सिल्ली, सालेबर्डी शिवधुरा सिमांकन रस्ते तयार केले. मात्र, आंबाडी ते पालगाव शिवधुरा सिमांकन रस्ता अपूर्ण होता. त्यामूळे आंबाडी ते पालगाव शेतशिवारातीलशेतकºयांना शेतीच्या कामासाठी लोकांच्या शेतमालाचे नुकसान करत कोणाच्याही शेतीतून जावे लागत असे.
त्यामुळे शेतकºयांचे आपसी भांडण व्हायचे, शिवाय कोणाला शेतात कोणतेही काम प्रा. संजय भुरे, भंडारा पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी, उपसरपंच गुरुदास बावनकर, पंचायत समिती चे अभियांत्रिकी पॅनल अभियंता वाडीभस्मे, रोजगार सेवक सुधाकर उभारताना रस्त्याची समस्या पुढे यायची, कोणाला शेती विक्री करण्याची गरज पडल्यास पडल्या भावाने मागितल जायचं म्हणून रस्त्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. सदर रस्ता ग्रामपंचायत सरपंच भजन भोंदे, ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष धनराज भुरे, पोलीस पाटील सौ. दुर्गा बावनकर, ग्रामपंचायत सदस्य अमीर बोरकर, मेघा भुरे, पालगावचे पोलिस पाटील भगवान साखरवाडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुखदेव मारबते, शेतकरी दादाराम भुरे, ठाकरे, बावनकर, साखरवाडे, संजू गणवीर, चंदू बावनकर, राहुल बोरकर, निशांत राऊत, अतुल माकडे, कंत्राटदार संतोष हटवार यांच्या उपस्थितीत रस्ता मोकळा शेंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *