प्रेसिडेन्ट कप २.० विदर्भ इंटर-डिस्ट्रिक राज्यस्तरीय सिनिअर पुरुष हॉकी स्पर्धेचा दिमागदार सोहळा संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा हॉकी असोसिएशन भंडारा च्यावतीने अध्यक्ष चषक २.० विदर्भ आंतरजिल्हा राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन पोलीस मुख्यालय मैदान भंडारा येथे करण्यात आले होते. त्यात नागपूर व भंडारा संघात रोमांचक सामना झाला व शेवटच्या मिनिटांत नागपूर संघाने बाजी मारत यश संपादन करून प्रेसिडेन्ट कपाचे मानकरी झाले आहेत. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेनीक्वाईट अशोसिएसनचे अध्यक्ष एड. मधुकांत बांडेबुचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुरूप्रीत सिंग, कुस्तिगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास शहारे, क्रिष्णा जोशी, सामाजिक कार्यकर्ते शिवा आजबले, क्रिष्णा उपरिकर, विलास केजरकर, शरद नखाते, भंडारा जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत ईलमे, किशोर जिचकार, श्यामू बांते, हरिश कपूर, किशोर गोंडाणे, तालेवार सर, सतीश फुलसुंगे, विवेक सिरीमा, गोपाल वैदय, आर्चरी असोशिएशनचे सचिव आशिक चुटे, शिल्पा सेलोकर, अमोल कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विदर्भ आंतरजिल्हा राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा येथील संघानी सहभाग घेतला होता.

नागपुर, भंडारा व वाशिम येथील हॉकी संघाने अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे. त्यांना ट्राफी व मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. त्यावेळी तलवारबाजी आंतरराष्ट्रिय खेळाडु शोहेब अन्सारी व वेस्ट बंगाल येथील स्पर्धेत भारताला कास्य पदक मिळवून देणारे भंडारा येथील खेळाडू ऋषभ गुप्ता व उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व फुलांचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आले. त्याबरोबर हॉकी स्पर्धेत बेस्ट गोलकिपर आयुश बान्ते, बेस्ट प्लेअर मोहित कटोते, बेस्ट फारवड करण ठोसरे व बेस्ट डिफेंडर म्हणून तुषार गायधने यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. आंतर जिल्हा ज्युनिअर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा दिनांक २२ ते २४ नोंव्हेबर २०२३ ला नागपूर येथे होणार आहे. अशी माहिती त्यावेळी मान्यवरांकडून देण्यात आली. तसेच हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या संघाचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन टेनीक्वाईट अशोसिएसनचे अध्यक्ष एड. मधुकांत बांडेबुचे यांनी केले.

प्रेसिडेन्ट कप २.० विदर्भ इंटर-डिस्ट्रिक राज्यस्तरीय सिनिअर पुरुष हॉकी स्पधेर्चा फाईनल नागपूर व भंडारा हॉकी संघात अटाटतीचा सामना रंगत असतांना सारख्या गुणांकावर होते. मात्र एका मिनिटात नागपूर संघाने गोल करून विजय संपादन केला आहे. हा सामना पाहण्यासाठी हौशी खेळाडू बरोबर नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे व प्रास्ताविक भंडारा जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तलवारबाजी अशोसिएशनचे अध्यक्ष सुनील कुरंजेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत शेंडे, कुणाल गभणे, अमोल खराबे, सागर भोंडे, राजेंद्र पिल्लारे, अरूण रेवतकर, कुणाल मेश्राम, पल्लवी गोंडाणे, श्रमिष्टा गोडबोले, वैशाली चिचुलकर, शितल नरबरिया यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.