जिल्हा परिषद शाळेचे नाव लौकिक वाढवाल- जि.प. अध्यक्ष जिभकाटे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : राज्य सरकार यांनी जवळपास २०१२ पासून शिक्षकांच्या भरत्या केलेल्या नाहीत. त्यामुळे कित्येक शाळा अशी आहेत की त्या ठिकाणी शिक्षक नाहीत. शिक्षक कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला ज्ञान देण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही. राज्य सरकारचा ग्रामीण भागातील शिक्षणाकडे फारच लक्ष नाही. या ठिकाणची विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षात घेता निश्चितच या शाळेचा दर्जा आजही जिल्हात कायम टिकून आहे. या पटसंख्यावरून आम्हाला दिसून येतो आहे. खाजगी शाळा असून जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढी पटसंख्या आमचे होतकरू जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र ईलमे यांच्या पुढाकारातुन आपल्याला सुचित होते आहे. शिक्षक हे खरोखरच निश्चितच चांगले काम करतात हे यावरून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे गुण संपादन करता यावे. यासाठी त्यांच्या एक-दोन सराव परीक्षा सुद्धा घेण्यात याव्या आणि त्या माध्यमातून त्यांची कसोटी निर्माण होईल. ती कसोटी पाहावी. या ठिकाणी बोलावले बोलण्याची संधी दिली. याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.

विद्यार्थी मित्रहो येणाºया परीक्षेसाठी मी आपणाला शुभेच्छा देतो आहे. परीक्षामध्ये चांगले गुण संपादन करून आमचे या जिल्हा परिषद शाळेचे नाव लौकिक वाढवाल अशी मी आशा व्यक्त करतो असे मत जिल्हा परिषदचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी बक्षीस वितरणप्रसंगी व्यक्त केले. पी.एम.श्री.जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे जिल्हा परिषद बुनियादी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मोहाडीचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि.२,३ व ४ जानेवारी २०२४ ला आयोजित करण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दि.४ जानेवारीला दुपारी ३ वाजता शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र ईलमे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बक्षीस वितरक शिक्षण सभापती रमेश पारधी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, राजेश सेलोकर, छाया डेकाटे, सचिन गायधने, महेश निमजे, देवश्री शहारे, सुमन मेहर, यादोराव कुंभारे, अश्विनी डेकाटे, सविता साठवणे, मनिषा गायधने, वंदना पराते, रेखा हेडाऊ, नंदा गजानन थोटे(भंडारा), रविंद्र वाघमारे, सारिका सतीश पटले, प्रेमलाल निमजे, मनिष पराते, घनश्याम श्रीपाद, मंगला विनोद चिंधालोरे, कौशल्या वासूदेव निखारे, सिराज शेख, दैनिक भंडारापत्रिकाचे यशवंत थोटे, ठाणेदार प्रदीप पुल्लरवार, प्राचार्य सुषमा पांडेय हे होते. प्रारंभी सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन सोबत शारदास्तवन हे हंसवाहिनी ज्ञानदायिनी अंबे विमल मती दे इयत्ता १० वीचे सलोनी दिलीप कुलरकर, मिसबा ईरफान अश्लेशा अजय लिमजे, ऐश्वर्या उमेश आठवले, सुहानी सुरेश निंबार्ते यांनी प्रस्तुत केले.

, विज्ञान, रांगोळी प्रदर्शनी अतिथीनी पाहणी केली. यावेळी खुशी भिकारी सव्वालाखे, खुशबू भिकारी सव्वालाखे, पूजा कुवर सव्वालाखे, खुशबू रवींद्र बावणे, संजना रामसिंह लिल्हारे, प्रतीक्षा वसंता सिलेकर, चेतना सेवकराम अटराये, दिव्या महेश मेश्राम यांनी ओ रे चिरिया यावर समूह नृत्य बक्षीस वितरणप्रसंगीप्रस्तुत केले. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण अतिथीच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा परिषद बुनियादीप्राथमिक शाळेतुन सेवानिवृत्त झालेले जेष्ठ शिक्षक श्रीमती विमल तेजराम गिरीपुंजे, मनोहर झंझाड(हरदोली)यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधवी राऊत, नामदेव साठवणे, नरेंद्र बारापात्रे, देविद्रा पटले, सेलोकर, नरेश मोटघरे, चुडामण हटवार, प्रफुल देशमुख, प्रतिक सोनेकर, शिवशंकर शेंडे, विश्वनाथ सिंगाडे, दिपाली मोहकर, सुषमा पाटील, मारोती मेश्राम, शशिकांत शेंडे, योगिता डेकाटे, धीरज दलाल, शीला नागदेवे, नलिनी पडोळे, प्रभा मोहकर, रोशनी धकाते, हिराली कुंभरे, भावना हलमारे, पूजा बांगडकर, अंकिता घडले, सोनाली वाडीभस्मे, सुधीर भांडारकर, अर्चना बंसोड, पायल सेलोकर, रिना तायडे, शालू मेश्राम, तुफानसिंग चव्हाण, राजेंद्र राऊत, नलिनी मेश्राम, किशोरी गायधने, नौशाद सैय्यद, चंद्रशेखर उके यांनी सहकार्य केले. अहवाल वाचन संयोजक प्रमोद घमे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य सुषमा पांडेय यांनी केले. बक्षीस वितरण संचालन ओमप्रकाश गायधने यांनी केले तर आभार प्रदर्शन छाया गायधने यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *