ग्रामस्थांचा गोसे धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : तालुक्यातील नेरला गावातील ९० टक्के शेतजमिन गोसेखुर्द धरण प्रकल्पात गेली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन हिरा वल्याने पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी १३ रोजी गोसेखुर्द धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे नेरला गावातील घरे पाण्याच्या ओलाव्यामुळे पडलेली आहे. गावात दूषित पाणी आल्यामुळे गावात दुर्गंंधी पसरलेली आहे आणि त्यामुळे अनेक आजार गावात उद्भवत आहेत. जलचर प्राण्यांना धोकासुद्धा निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतने नेरला तर्फे गावाचे पुनर्वसन करण्याबाबत डिसेंबर २००२ पासून शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आले.

जुलै २०२३ रोजी तहसीलदारांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मार्फत गावातील लोकसंख्या, कुटूंब व घरांची संख्या अशी माहिती सुध्दा देण्यात आली. मात्र आजपर्यंत नेरला गावाच्या पुनर्वसन संबंधाने काहीच हालचाली झालेल्या नाही. शासनाने तातडीने मोजमाप करून घरांचा मोबदला देण्यात पुनर्वसनासाठी नवीन गावठाणचे भूखंड मंजूर करावी,अन्यथा १३ डिसेंबर २०२३ च्या ग्रामसभेत गावकºयांनी गोसेखुर्द धरणाच्या पाण्यात जलसमाधी करण्यात येईल असा ठराव घेतला आहे. गावाचे पुर्वसन करण्यासोबतच पुनर्वसनग्रस्त कुटूंबातील सदस्याला शासकीय नोकरी किंवा रोजगारासाठी अनुदान द्यावे, गावातील सर्व कुटूंबातील सदस्यांचा अंत्योदय यादीत समावेश करावा, गावा लगतच्या शेती सुद्धा संपादीत करावी, अशी मागणी गावकºयांची आहे. यावर शासनाने तत्काळ कारवाई न केल्यास गावातील सर्व कुटूंबातील पुरुष, महिला, बालकांसह गोसेखुर्द धरणाच्या पाण्यात १३ डिसेंबर रोजी जलसमाधी घेणार असल्याची माहिती गावकºयांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.