अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल साकोली येथे गुरूनानक जयंती सोहळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : स्थानिक अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कूल (एकोडी रोड) साकोली येथे गुरूनानक जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरूनानकदेव जी यांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन करुन पुष्प अर्पण शाळा व्यवस्थापक जी.एच. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापिका स्मिता घोरमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गुरूनानक देवजी यांच्या जंयतीदिनानिमित्त कु.केनिशा रहाटे, हितिका चंदवानी, आराध्या गुप्ता, गित नशिने ह्यांनी गितगायन करून जयंती दिनाचे औचित्य साधले. जी.एच.ठाकरे ह्यांनी सिख पंथाचे संस्थापक श्री गुरूनानक देवजी यांचे शांती, समानता पुर्वक कार्य आणि जिवन चरित्राविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी संजय लांजेवार, धनराज मेश्राम, सचिन मारवाडे, निखिल निंबेंकर, सारीका ठाकरे, शिवाली गुप्ता, मृणाली कोसे, नंदा कापगते, अतुल नंदेश्वर, कमलेश वासनिक, मोहन रहीमतकर, लता कटरे, दिक्षा गेडाम, निशा रामटेके, पुनम वाडीभस्मे, पुष्पलता आसलवार, मालती इरले, प्रिती धुर्वे, पल्लवी कांबळे, श्रुनाली जवंजाळ, कृपाली राऊत, मयुरी हटवार, रेश्मा ढोमणे, सशिर वालदे ह्यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन कु.लेखी पुस्तोडे ह्यांनी तर मयंक चिंचखेडे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *