विनोबा नगर तुमसर येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय म्हणजे अभ्यासकांसाठी वरदान : शुभांगी मेंढे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खरबी : सर्वांना वाचनासाठी मोफत व खुले असलेले छत्रपती शीवशंभू प्रतिष्ठान, तुमसर संचालित छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय येथे श्रीमती शुभांगीताई मेंढे यांनी भेट देऊन अभ्यासकांना व प्रतिष्ठान च्या मावळ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी जीवनात वाचनालयाची भूमिका किती महत्वपूर्ण आहे हे सांगून करता येईल तेवढी मदत करण्याचे केवळ आश्वासन न देता लागलीच सुसज्ज बैठक व्यवस्थेसाठी प्रशस्त टेबल व खुर्च्या उपलब्ध करून दिल्यात.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.

मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी निस्सीम प्रेम व श्रद्धा बाळगणाºया ताई यांनी नियमितगडकिल्ले वारी करत असल्याचे सांगितले प्रस्तुत समयी विद्यार्थ्यांना नोकरीविषयक असलेल्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गीताताई कोंडेवार, अर्चनाताई भुरे, शोभाताई लांजेवार, प्रीतिताई मलेवार, रॉयताई, आदितीताई काळबांधे, रुखमाताई धांडे, ज्योतिताई गोलीवार व छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इंजि.नितीन धांडे प्रतिष्ठान चे सचिव प्रा.अमोल उमरकर, कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, युवनेश धांडे, गीतेश गानोरकर, दिपाली मते, व इतर मावळे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.