भंडाºयात तरुणाची निर्घृण हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: आपसी वादातून दोघांनी एका तरुणाचा चाकुने वार करुन निर्घृण खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह नालीत फेकून मृतदेह लपविण्यासाठी त्यावर दुचाकी ठेवली. ही घटना सोमवारच्या मध्यरात्री भंडारानजिकच्या टाकळी येथे घडली. आज सकाळी ही घटना उजेडात आली. कपील अशोक उजवणे (३१) असे मृताचे नाव असून ऋषभ संजय दोनोडे (२०) आणि करण दिलीप भेदे (२०) अशी मारेकºयांची नावे आहेत. मृतक आणि आरोपी हे भगतसिंग वॉर्ड टाकळी येथील रहिवासी आहेत. पोलिस सुत्रानुसार, मृतक कपील उजवणे व आरोपी ऋषभ आणि करण यांच्यात सोमवारच्या रात्री टाकळी येथे वाद झाला. भांडण विकोपाला गेल्याने ऋषभ आणिकरण यांनी कपीलला टाकळी येथीलच निर्वाण मेटल कंपनीच्या मागील बाजुच्या मैदानात नेले. तिथे चाकुने कपीलच्या छातीवर, चेहºयावर अनेकदा वार करुन जिवानीशी ठार केले.

आरोपीएवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कपीलचा मृतदेह उचलून निर्वाण मेटल कंपनीच्या मागे असलेल्या सिमेंटच्या नालीत त्याचा मृतदेह फेकला. त्यानंतर कपीलच्या मृतदेहावर त्याच्याच मेहुण्याची मोपेड ठेवून मृतदेह लपवून ठेवला. दरम्यान आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात येताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनाम्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी आरोपी ऋषभ दोनोडे आणि करण दिलीप भेदे यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *