केसलवाड्याची पोलीस चौकी झाली जनावरांचा गोठा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दूरवरच्या गावांमध्ये पोलीस चौकीच्या माध्यमांतून नियंत्रण केले जाते. मात्र हीच पोलीस चौकी जेव्हा गुरांचा गोठा होतो तेव्हा गावक-यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी? असा प्रश्न केसलवाडा /पवार येथे निर्माण झाली. लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार या गावामध्ये २०१८ मध्ये तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार बाळा काशीवार, पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या उपस्थित पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच ही चौकी बंद झाली व गावकºयांना सुवेवस्थेची समस्या उतभवूलागली. ही चौकी ज्या घरी लावण्यात आली होती, त्या घरमालकाला अद्याप घरभाडे मिळालेलं नाही.

त्यामुळे सचिन ठाकरे यांनी या जागेचा उपयोग घरचे जनावरे बांधण्यासाठी केलेला आहे. आता गावातील नागरिकांना गुन्ह्यांची तक्रारी देण्यासाठी चक्क १२ किमी लांब प्रवास करत लाखनी या ठिकाणी जावे लागत आहे. केसलवाडा पवार हे गाव लाखनी तालुक्याच्या काठावर असल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करत तालुक्याच्याठिकाणी जावे लागत आहे. आता घर भाड्याअभावी गोठा झालेली पोलीस चौकी ही नियमित शिपाई देऊन पूर्ववत करावी अशी गावकºयांची मागणी होत आहे.
पोलिस चौकीच्या थाटामाटात उद्घाटन झाल्यावर काही महिने पोलीस शिपाई या ठिकाणी यायचे मात्र अता पूर्णपने येणे बंद झाले आहे.माझा खोलीचा किराया अद्याप मिळायचा आहे.त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की घर भाडे त्वरित देण्यात यावे. सचिन ठाकरे, घरमालक
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस चौकीच्या माध्यमांतून नियंत्रण होईल त्यामुळे ही बंद पडलेली पोलीस चौकी कायम शिपाई देऊन पूर्ववत सुरू करावी. रोमिला बिसेन सरपंच, केसलवाडा/ पवार

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *