फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घेतले गौ आधारित उत्पादनांचे प्रशिक्षण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी वरठी : अनुराग कॉलेज आॅफ फार्मसी व गौविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष बीफार्मसीच्या विद्यार्थ्यांकरिता गौ अनुसंधानावर आधारित तंत्रज्ञान व उत्पादनाचे सात दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. गौ विज्ञान भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात गायीचा आधारित जीवनशैलीस प्रोत्साहन देते. मानवी जीवन चक्रातील गाय व तिच्या संततीच्या भूमिकेवर संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचे काम करते. अशासंस्थेतून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना अमूल्य व्यावहारिक अनुभव मिळून भविष्यात व्यावसायिक वाढीस हातभार लागणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान सनत गुप्ता, सुनील मानसिंग, डॉ.नंदिनी भोजराज, अंकित काळे यांचे मार्गदर्शन लाभले. याकरिताप्राचार्य डॉ.संजय वाते, प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रभारी सचिन लोहे यांनी गौ-विज्ञान अनुसंधान केंद्राच्या चमूचे आभार मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *