शेतातील विहिरीत पडलेल्या अजगराला जीवदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : जवळील सुकळी/ नकुल येथील रामदास आंबेडारे यांचे शेतातील विहिरीत पडलेल्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले. विहिरीत साप असल्याची माहिती मिळताच चुल्हाड येथील सर्पमित्र शुभम तुमसरे तसेच त्याचे सहकारी लक्ष्मण खडसन व रोहित नान्हे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी मोठ्या शिताफीने विहीरीतून साडेपाच फूट लांबीचा अजगर बाहेर काढला. पुढे ग्रीनव्हॅली चांदपूरच्या जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सर्प मित्र शुभम तुमसरे यांनी अजगर साप विषारी नसल्याचे सांगून साप दिसून आल्यास त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलविण्याचे आवाहन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *