डॉ.धनंजय सावळकर महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) म्हणून रुजू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अतिरिक्त जिल्हाधिकारी या मूळ पदावर कार्यरत असलेले डॉ. धनंजय सावळकर यांनी नुकतेच महानिर्मिती कंपनीत कार्यकारी संचालक (मानव संसाधन) या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते सह संचालक या पदावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कार्यरत होते. डॉ. सावळकर हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशु संगोपन पदव्युत्तर शिक्षणासोबत कायद्याची पदवी संपादित केली आहे तसेच रियल इस्टेट व्यवस्थापन पदविका शिक्षण देखील पूर्ण केले आहे. त्यांची कारकीर्द विक्रीकर निरीक्षक, उपजिल्हाधिकारी, उप विभागीयअधिकारी, राज्यमंत्री (सामान्य प्रशासन व ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, इत्यादी महत्वाच्या पदांचा कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे. जूलै २००५ मध्ये महापूर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदान. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांचा केंद्रप्रमुख/समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.

महसूल विभागा संबंधित न्यायप्रविष्ठ प्रकरणे पाठपुरावा, हाताळणे,कोठडीतील मृत्यू, अपघात, चकमकी, न्यायालयीन चौकशीचे कामकाज केले आहे. संजय गांधी योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना यासारख्या सामाजिक योजनांची त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली आहे. सेतू सुविधा केंद्र (नागरी सुविधा केंद्र) व महा ई-सेवा केंद्र यांचेवर पर्यवेक्षणाचे कामकाज केले आहे. विक्रीकर, जमीन महसूल, करमणूक कर बाबत तसेच लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवती बँक निवडणूकांचे कामकाज केले आहे. जात प्रमाणपत्राविषयी सहयाद्री वाहीनीवर जय महाराष्ट्र टि.व्ही.शो मध्ये एक तास मुलाखत आणि जात प्रमाणपत्राविषयी मुंबई आकाशवाणीवर एक तासाचे जनजागृतीपर संभाषण केले आहे. शासकीय दाखले (अधिवास/ उत्पन्न/ जाती/ नॉन क्रिमीलेयर) करीता आवश्यक असणाºया कागदपत्रांविषयी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे ६०० महाविद्यालयांना मार्गदर्शन केले.

यशदा पुणे येथे प्रशासकीय सुधारणा, ईगव्हर्ननस, जमीन विषयक अभिलेख संगणकीकरण प्रशिक्षण पूर्ण केले. मा.राष्ट्रपती व मा.पंतप्रधान यांचे दौरा कार्यक्रमाच्या वेळी दोन वेळा संपर्क अधिकारी म्हणून देखील काम पाहिले आहे. मुरबाड येथे शासकीय जत्रेचे आयोजन. वरीष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत पालकांना न सांभाळणाºया मुलांविरुद्ध महाराष्ट्रातील पहिली शिक्षा प्रकरण पारीत केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मक्तेदारी नियंत्रण, नवीन भूसंपादन कामकाजाचा अनुभव. कातकरी बांधवांना तीन तासांत जातीचा दाखला देण्याचा अभिनव उपक्रम अलिबाग येथे राबविला. मुरबाड तालुक्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, झोपडपट्टी निर्मूलन कायद्या अंतर्गत कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. सुवर्णजयंती राजस्व अभियान, शासन आपल्यादारी, महाराजस्व अभियान, जलयुक्त शिवार अभियान, इत्यादी उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. विशेष म्हणजे, सर्वांगीण पर्यटन विकासासाठी भारताचे मा.उप राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार आणि ६ नवीन पर्यटन धोरणे आणल्याबद्दल पर्यटन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित. पर्यटन परिषदेसाठी इंग्लंड, इंडोनेशिया आणि फिलीपिन्सला देशांना भेट.एकूणच प्रशासकीय कामकाजात त्यांचा हातखंडा आहे. स्पर्धेच्या युगात महानिर्मितीच्या मनुष्यबळाचे कौशल्य अधिकाधिक विकसित करून एकूणच वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढविणे, सांघिक भावनेसह सशक्त वातावरण निर्माण करणे तसेच मनुष्यबळाशी निगडित समस्यांचे प्राधान्याने निरसन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *