अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रंगीत तालीम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महामार्ग पोलिस केंद्र गडेगाव जिल्हा भंडारा कडून बुधवार दि. २४ मे २०२३ रोजी मोटार वाहन अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी व जखमींचे प्राण वाचावे तसेच अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास त्याबाबत योग्य नियोजन करून उपाययोजना करता याव्या याकरिता रंगीत तालीम घेण्यात आली. अशी घेण्यात आली रंगीत तालीम:- रंगीत तालीम मध्ये म. पो.केंद्र गडेगाव येथे अपघाताची माहिती प्राप्त झाली, त्यानंतर म. पो.केंद्र गडेगाव कडून पुढील प्रमाणे कारवाही करण्यात आली. म. पो. केंद्र गडेगाव परिसरात सहा.पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले हे स्टाफसह पेट्रोलिंग वर असतांना एनएच ५३ वर जांभळी ते मोहघाटा दरम्यान ट्रक व मोटारसायकल मध्ये अपघात झाल्याची खाजगी इसमाकडून माहीती मिळाल्याने तातडीने स्टाफसह रवाना होवून घटनास्थळी पोहोचले असता ट्रक क्र सीजी ०४ पी ४३५१ (काल्पनिक) व होंडा शाईनमोटारसायकल क्र. एमएच ३६ एएम १५९३ (काल्पनिक) यांच्या मध्ये अपघात झालेला दिसला.

प्रथम दर्शनी मोटार सायकल चालक हा ट्रक च्या डाव्या बाजुने ओव्हरटेक करतांना ट्रक चालकाने त्याचा ट्रक डाव्या बाजुला किंचित वळविल्याने ट्रक ची कट लागून मोटार सायकल चालकाचे संतुलन बिघडून लागून जास्त रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला असल्याचे दिसले व वाहतुक पूर्णपणे विस्कळीत झालेली होती. सर्वप्रथम १०८ वर कॉल करून अ‍ॅम्बुलन्स ला पाचारण केले तसेच अशोका टोल प्लाझा साकोली येथील हेल्पलाईन नंबर वर कॉल करून, त्यांचा पेट्रोलिंग स्टाफ व ट्रक बाजुला पोलिसांना माहीती दिली. दरम्यान अपघातातील जखमी इसमास प्रथमोपचार देण्यात आले. काही वेळातच स्थानिक पोलीस व अशोका टोल प्लाझा ची अम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली. जखमीस तात्काळ अम्बुलन्स ने ग्रामीण रुग्णालय साकोली येथे उपचारासाठी रवाना करण्यात तो खाली पडला.

त्यामुळे त्यांच्या डोक्याला जास्त मार करण्यासाठी क्रेन ची मागणी केली. व स्थानिक आले. स्थानिक पोलीस, टोल पेट्रोलिंग स्टाफ तसेचक्रेन च्या साहाय्याने ट्रक बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. अश्या प्रकारे म. पो.केंद्र गडेगाव कडून जखमी ईसमास तातडीची वैद्यकीय मदत देऊन वाहतूक कोंडीचे योग्य नियोजन करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या रंगीत तालीम मधे महामार्ग पोलिस केंद्र गडेगाव येथील अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलिस उप निरीक्षक नितीन आगाशे, अमलदार सहा.फौ. रवींद्र पवणकर, कृष्णा भुते, पो.हवा.नामदेव नखाते, प्रमोद चेटुले, राहुल गिºहेपुंजे, पोलिस नायक प्रकाश तांडेकर, विनोद उपरकर, हुकुमचंद आगाशे, उमेश टेंर्भुणीकर पो. शी.कैलास गायधने, दुर्योधन वावरे, रजनीकांत हुमणे तसेच अशोका टोल नाका येथील स्टाफ, डॉक्टर अतुल मेश्राम, चालक प्रवीण शहारे, सहायक अनिल शेंडे, सत्यजित गजभिये, विशाल निर्वाण, पवन चौधरी, उमेश उपासे, आसिक गणवीर व वाहन क्र.एम एच.३६ एफ.३८२०, अंबुलन्स क्रमांक एम.एच.३६ के.१२४७ यांचा सहभाग होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *