फसवणूक करुन तो बनला प्राध्यापक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महाविद्यालयातील कर्मचाºयाने खोटे प्रमाणपत्र विद्यापीठाला सादर करुन स्वत: पूर्णकालीन प्राध्यापक तर अन्य दुसºयाला प्राचार्य म्हणून नियुक्ती केल्याचा प्रकार देवरी तालुक्यातील सुरतोली लोहारा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात उघडकीस आला. जनता बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित सुरतोली लोहारा येथील डॉ. आंबेडकर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सचिव राजकुमार केवळराम मडामे हे महाविद्यालयाचा कारभार पहात होते. दरम्यान त्यांनी २०१२ मध्ये आरोपीची कर्मचारी म्हणून नेमणूक केली व महाविद्यालयाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपविली. मात्र आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर करीत सचिवांना वा संस्थेला कोणतीही पूर्वसूचना वा माहिती न देता दुसºया आरोपीची तात्पुरत्या स्वरुपातील प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.

दरम्यान २०१९ मध्ये सचिव राजकुमार मडामे यांनी महाविद्यालयाचा कारभार हाती घेतला असता आरोपी कर्मचारी व त्याने नियुक्त केलेल्या तात्पुरत्या प्राध्यापकाचे नाव प्राध्यापकांच्या फलकावर पूर्णकालीन प्राध्यापक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मडामे यांनी दोन्ही आरोपीच्या नेट परीक्षेचे प्रमाणपत्राची झेरॉक्स पडताळणीसाठी युजीसी दिल्ली येथे पाठविले असता ते प्रमाणपत्र बनावटी असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आरोपीने सचिव व संस्थेच्या पदाधिकाºयांच्या खोट्या स्वाक्षºयासह बनावटी प्रमाणपत्र विद्यापीठाला सादर करुन स्वत:ची प्राध्यापकपदी व दुसºया आरोपीची प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती करून महाविद्यालयाची फसवणूक केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी राजकुमार मडामे यांच्या तक्रारीवरुन देवरी पोलिसांनी आरोपींवर भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस शिपाई घाडगे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *