नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सामाजिक न्याय पर्व कार्यक्रम संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नशा मुक्त भारत अभियान सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमा अंतर्गत इंडियन वेलफेअर इन्टीग्रेटेड रिहॅबिलीटेशन सेंटर फॉर अ‍ॅडीक्ट बेला, भंडारा द्वारा व्यसनमुक्ती जनजागृती रॅली, शपथविधी व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. दि. २१ एप्रिल २०२३ ला सावित्रीबाई फुले विद्यालय, बेला येथे मुख्याध्यापक, राधेश्याम धोटे यांच्या अध्यक्षतेखाली नशा मुक्त भारत अभियान सामाजिक न्याय पर्व रॅली व शपथविधी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. यावेळी किशोरवयीन मुलांमधील व्यसनाधिनतेचे कारणे व वाढती व्यसनाधिनता आणि व्यसनाबद्दल माहिती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन प्रशांत वैद्य, निलिमा चंदनखेडे, शालीनी आगलावे यांनी केले.

दि. २४ एप्रिल २०२३ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह भंडारा येथे श्रीमती सी. के. फुलझेले प्रभारी गृहपाल यांच्या अध्यक्षतेखाली युवकारिताव्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधिनता, व्यसनाचे प्रकार, व्यसनांपासून होणारे आजार व व्यसनमुक्त नशा मुक्त भारत करण्याकरिता युवकाची भुमिका इत्यादी विषयांवर प्रशांत वैद्य, प्रकल्प समन्वयक व अजय वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. दि. २५ एप्रिल २०२३ ला ग्राम कारधा येते महिला मेळाव्याचे आयोजन सौ. वैशाली विलास दिवटे यांचे अध्यक्षतेखाली आणि सौ. व्हि.के. डाहके, सुपरव्हायझर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वाढती व्यसनाधीनता, व्यसनामुळे होणारे विविध आजारतसेच व्यसनामुळे होणारे कौटूंबिक, सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम व त्यांचे माहिलावर होणारे प्रभाव, नशा मुक्त भारत अभियानामध्ये महिलांची भुमिका इत्यादी विषयांवर सौ. शालीनी आगलावे व निलिमा चंदनखेडे यांनी मार्गदर्शन केले.

दि. २६ एप्रिल २०२३ ला इंडियन वेलफेअर इन्टीग्रेटेड रिहॅबिलीटेशन सेंटर फॉर अ‍ॅडीक्ट बेला, भंडारा येथे डॉ. अमित मेश्राम व्यसन उपचार तज्ञ तथा सायक्याट्रीस्ट यांनी रुग्णांची तपासणी करुन व रुग्णांना व्यसनाबद्दल माहिती व व्यसनामधून आपण कसे बाहेर पडू शकतो यांचे मार्गदर्शन केले. तसेच व्यसनामधून मुक्त होण्यासाठी इन्टीग्रेटेड रिहॅबिलीटेशन सेंटर फॉर अ‍ॅडीक्ट बेला येथे भरती राहून पूर्णपणे समुपदेशन उपचार घेण्याची आवश्यकता आहे तरच व्यसन मुक्त होऊ शकतो असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमामध्ये प्रशांत वैद्य, निलिमा चंदनखेडे, भारती थुलकर, रिता मेश्राम, वैशाली लेंडे, अजय वानखेडे, शितल रामटेके, अविष्कार मेश्राम, विलास पंचबुध्दे, शितल रामटेके, माधूरी दिवटे, इत्यादी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *