धनेगावात शाळा पूर्वतयारी मेळावा थाटात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : धनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मेळाव्याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. सुषमा पारधी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच धनराज उईके होते तर विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कटनकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शुभालता पुराम, उपाध्यक्ष ललित गजभिये, पोलीस पाटील निशा शामकूवर, ग्रामपंचायत सदस्य मनोरमा वाघाडे, स्मिता वाहने प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सर्व लहान बालकांचे नोटबुक व पेन देऊन त्यांचे कौतुक केले. चिमुकल्यांचे कुमकुम लावून भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. मेळाव्यात राजेंद्र रामटेके, विजेंद्र बिसने, अरविंद मडावी, सरविंद बोपचे, जितेंद्र मसराम, गोवर्धन ठाकरे, खेमराज नान्हे, शामकिरण पारधी, राजेश उईके, संदीप काळसर्पे, सतीश वाहने, अनवर मसराम, खुशाल पटले, धनराज वाघाडे, सौ.वर्षा रामटेके, सौ. सुनीता मडावी, सौ.सत्यभामा बिसने, सौ.कविता मसराम, सौ. पद्मा ठाकरे, गीता नान्हे, सूर्यकांता पारधी, सौ.नीला उईके, विद्या काळसरपे, स्मिता वाहने, अंजू मसराम या सर्व आई-वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात पहिल्यावर्गातील मातांचे गट करून त्यांना उन्हाळ्यामध्ये मुलांना घरी हसत खेळत कसे शिकवावे याचे मार्गदर्शन मुख्याध्यापक पद्माकर रहागडाले, शिक्षिका किरण बडवाईक यांनी केले.

या मेळाव्यात विहान राजेंद्र रामटेके, निशांत अरविंद मडावी, भूपेश विजेंद्र बिसने, शिवम सर्विंद बोपचे, जीत जितेंद्र मसराम, आरोषी गोवर्धन ठाकरे, रुद्र खेमराज नान्हे, अलिषा पारधी, पूर्वी राजेश उईके, भावेश काळसर्पे, अलिषा वाहने, कनक वाघाडे, निशांत पटले हे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सरिता मरसकोल्हे, रेखा गजभिये, विलास काळसर्पे, शालिनी मसराम, गीता पारधी यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.