ज्याला हिंदू असण्याचा गर्व नाही तो अर्धवट हिंदू : आ. नरेंद्र भोंडेकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गर्व से कहो हम हिंदू है म्हणणे गवार्चीच गोष्ट आहे, ज्याला हिंदू असण्याचा गर्व नाही तो अर्धवट हिंदू आहे आणि अश्याच अर्धवट हिंदू मुळे मुठभर इंग्रजांनी भारतावर राज्य केल्याचे विचार आ. नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. ते येथील रेल्वे मैदानावर आयोजित श्री राम जन्मोत्सवाच्या तिसºया दिवशी आयोजनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पूर्व आ. चरण वाघमारे व पाहुण्यांच्या हस्ते दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जैकी रावलानी, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गायधने, उपाध्यक्ष सुरेश धुर्वे, शहर अध्यक्ष मनोज साकुरे, शहर संघटक नितीन धकाते, बंडू हटवार, सेवक कारेमोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करतांना आ. भोंडेकर म्हणाले कि मयार्दा पुरुषोत्तम प्रभू राम हे हिंदू धर्माच्या इतिहासात झाले याचा अभिमान सर्वांना असावा. त्यांचा जन्मोत्सव हाचार पाच दिवसांचा नसून वर्षभर चालायला हवा.

ज्या धर्मात जन्मलो त्या हिंदू धमार्चा सम्मान करायलाच हवा. ज्याला आपल्या धर्माचे महत्व कळत नाही त्याला दुसºाा धर्माचाआदर राहत नसल्याचे विचारत्यांनी व्यक्त केले. आ. भोंडेकर पुढे म्हणाले कि आज निवडणुका नाहीत नक्कीच भगव्या रंगाचे कर्ज कुठेतरी फेडायचे आहे. कारण याच भगव्या रंगाने आपल्याला अपक्ष निवडून दिले. ते पुढे म्हणाले कि हिंदू धर्मात एकता नसल्याने गोर गरीब लोकांना इतर धर्मात परिवर्तीत केरात आहेत. देशात अन्य देशाच्या धर्माचा प्रचार प्रसार होत आहे. हिंदू हा संस्काराचा विषय आहे ज्याच्या घरी हिंदू संस्कार आहे त्याचा घर उत्तम होवू शकतो. खरा हिंदू कुणावर अत्याचार करू शकत नाही आणि कुणावर अन्याय होत असेल तर मदतीला धावेल. पाच दिवसीय राम जन्मोत्सव दरम्यान विविध क्षेत्रात काम करणाºया समाज सेवक, कर्मचारी यांना स्मृतीचिन्ह देवून त्यांचे सत्कार करण्यात येत आहे.

तिसºया दिवशी पोलीस विभागात कौतुकास्पद काम करणारे आणि कोरोना काळातही जीवाची परवाह न करता दायित्व निभावणारे ३० पोलीस कर्मचाºयांचे आणि ५० आशा सेविकांचे सत्कार करण्यात आले. उद्घाटन आणि सत्कार समारोह नंतर इंडियन आयडियल फेम वैशाली रायकवार आणि इशरत जहा यांनी आपल्या मधुर स्वरात दर्शकांना भक्ती गीतात ओतून घेतले. यात दुर्गा मत, महादेव, श्री रामाची भजन व गीते प्रस्तुत करण्यात आली. ज्याचा आनंद श्रोत्यांनी लुटत नृत्य सुद्धा केले. आयोजन दरम्यान महिला पदाधिकाºयांनी दोन्ही गाईकांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले आणि दोन्ही गाईकांना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून त्यांचे सत्कार करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *