सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम त्वरीत करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातिल सर्वात जुनी वस्ती म्हणुन शुक्रवारी वार्ड प्रसिध्द आहे. आणि याच वार्डात किसान चौक नावाचं एक गजबजलेला व नावारुपाला आलेला चौक आहे. हा चौक जनतेसाठी एक महत्वपूर्ण स्थान आहे. कारण याच चौकात ग्रामिन भागातिल मजुर, कामगार, शेतकरी, मोठ्या प्रमानात जमा होत असतात. हा भाग गरीब व शेतकºयांचा कष्टकºयांचा भाग म्हणुन भंडारा शहरात प्रसिद्ध आहे. तसे बघता या भागात मोठ्या प्रमाणात गरीब व मजुर लोक वास्तव्यास असतात. अनेक लोकांच्या घरी शौचालयाची व्यवस्था नाही म्हणुनच भंडारा नगर परिषदेने या चौकात चाळीस-पन्नास वर्षा अगोदर जनतेच्या सोयीकरीता सार्वजनिक शौचालय बांधुन दिले होते. परंतु सध्या स्थितीत हे शौचालय जुने व जिर्णझाल्यामुळे नगर परिषदेने त्याला तोडले व याच ठिकाणी नविन शौचालय बांधुन देण्याचे घोषितही केले. परंतु बरेच दिवस निघुन गेले तरी या ठिकानी नविन शौचालय बांधुन देण्यात आले नाही. उलट या ठिकाणी सोपे आधुनिक शौचालय आणुन ठेवण्यात आले.

हे शौचालय उंच स्थितीत असल्यामुळे म्हाताºया व्यक्तिला या ठिकाणी शौचास जाण्यास त्रासदायक आहे. अशा स्थितीला कंटाळुन वयोवृध्द व्यक्ति हताश झाले आहे. ही परीस्तिथी इंटकचे जिल्हाअध्यक्ष धनराज साठवने ह्यांच्या लक्षात येताच त्यांनी भंडारा नगर परिषदेकडे धाव घेऊन जनतेच्या समस्येचे निराकरण व्हावे म्हणुन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे विनंती केली कि किसान चौकातिल शौचालय लवकरात लवकर बांधुन देऊन गरीब जनतेच्या समस्येची सोडवणुक करावी. निवेदन देतांना भंडारा शहर कांग्रेस कमेटी चे शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, इंटकचे जिल्हा उपाध्यक्ष जिवन भजनकर, माजी नगर सेवक पृथ्वीराज तांडेकर, इंटकच्या शहर अध्यक्षा सौ स्नेहा भोवते, फारुख शेख, दशरत जिभकाटे, लक्ष्मीबाई लांजेवार, गिता साकुरे, वच्छलाबाई गभने, गोपिका कुंभलकर, विमलबाई सेलोकर इत्यादि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *