देश घडवायचा असेल तर नवीन पिढीला शिक्षित करा : आ. नरेंद्र भोंडेकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथे विविध धार्मिक स्थळे असून यात विविध प्रकारचे सामाजिक कार्य होतात. हि धार्मिक स्थळे अध्यात्म करिता असले तरीही याचा उपयोग काही लोक राजकारणा करिता करून घेतात. याचा वापर जर शैक्षणिक क्षेत्राकरिता झाला तर नवीन पिढी घडेल आणि जर राज्य किंवा देश घडवायचा असेल तर नवीन पिढीला शिक्षत करण्याचे आवाहन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले. ते श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती निमित्त आयोजित समारोह आणि ई- लायब्ररी लोकार्पण समारोहास उद्घाटक म्हणून संबोधित करीत होते. श्री संत शिरोमणी रविदास देवस्थान पंच कमेटी द्वारा गांधी वार्ड येथे आयोजित कार्यक्रमा दरम्यान आ. भोंडेकर यांच्या हस्तेश्री संत रविदास यांच्या मूर्तीचे पूजन आणि ई लायब्ररीचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला संबोधित करताना आ. भोंडेकर पुढे म्हणाले कि, दलित वस्ती उत्थानासाठी येणाºया निधीचा वापर आज पर्यंत रस्ते आणि नाल्या बनविण्या करिता करण्यात आला. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा समाजाचे विकास होत नसेल तर आमदार खासदारांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. म्हणून समाजाच्या विकास करिता येणारा पैसा रस्ते नाल्यात लावण्या पेक्षा समाजाच्या विकास करिता विविध समाजाच्या धार्मिक स्थळावर ईलायब्ररी सारखे प्रस्ताव घेतले जात आहे.

आजही चांभार समाज हा अशिक्षितच असून अति मागासलेला समाज म्हणून ओळखल्या जातो. समाजाला विकसित करायचे असेल तर शैक्षणिक क्रांतीची गरज आहे. पैसा नसेल तर एक वेळचे जेवण कमी करा पण आपल्या पाल्याला शिक्षण द्या. कारण पाल्यांना शिकवलं तर परिस्थिती बदलेल आणि तुम्हाला नोकरीच्या मागे धावा लागणार नाही नोकरी तुमच्या मागे धावेल. म्हणून येणाºया वार्षिक नियोजनात नगर परिषदेच्या शाळांचे उत्थान होणार असून या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहे. आम्ही लोकप्रतिनिधी सगळ्या समाजाला देण्या करताच आमदार झालो आहोत. आपल्यामुळे एखाद्या समाजाचा विकास होत असेल तर नक्कीच त्यात अग्रणीय राहिल्या पाहिजे. म्हणून भंडाºयात शिक्षणात प्रगती कसे करता येईल या करिता धार्मिक स्थळा वर ई लायब्ररी सारखे प्रयोग केले जात आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष मनोज साकुरे, रुपचंद भोंडे, हिंदवी प्रतिष्ठानचे जैकी रावलानी, माजी नगर सेवक नितीन धकाते, अभय भागवत, नंदू तांडेकर, पृथ्वीराज तांडेकर, श्रीमती लक्ष्मी तांडेकर, शीलेश खरोले, मनोज बोरकर, यादव चौबे माजी नगर सेविका आशा उईके आदी मंचावर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *