विद्यार्थीनीच्या द़ृष्टिदोष शस्त्रक्रीयेसाठी मदत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रेरित होऊन दृष्टिदोष असलेल्या एका विद्याथीर्नीच्या शस्त्रक्रीयेसाठी अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी आर्थि क मदत केली. गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील ७ व्या वर्गातील डिम्पल ही अभ्यासात हुशार आहे. तिला लिहिता-वाचताना त्रास होत असल्याने तिची नेत्र तज्ञाकडून तपासणी करण्यात आली. यात डिम्पलच्या नेत्रात ४० टक्के दृष्टिदोष असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र घरची आर्थिक स्थिती बेताची. यामुळे तिचे कुटुंबिय चिंतेत पडले. त्यांनी मुलिच्या नेत्र शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची हाक दिली. प्रसंगी गोरेगावचे पोलिस निरिक्षक सचिन म्हत्रे यांना सदर बाब माहित झाली. त्यांनी डिम्पलच्या आईवडिलांची भेट घेऊन आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. म्हत्रे यांनी ही बाब अपर अशोक बनकर यांना सांगीतली. त्यांनी आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने विना विलंब मदत करण्याचा निर्धार केला. क्षणाचाही विलंब न करता बनकर यांनी म्हत्रे यांच्यासोबत कुºहाडी गाव गाठून डिम्पल्याच्या नेत्र शस्त्रक्रीयेसाठी १० हजार रुपयांची मदत तिच्या आईवडील्यांच्या स्वाधिन केली. यावेळी डिम्पलच्या आईवडीलांचे डोळे आनंदाने भारावून गेले. डिम्पलच्या नेत्राची शस्त्रक्रीया करून तिला उच्च शिक्षण देण्याचे आश्वासन देत त्यांनी पोलिस अधिकाºयांचे आभार मानले. लवकरच डिम्पलच्या डोळ्याची शस्त्रक्रिया होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *