लाच मागण्याचे आरोपातून पोलीस उपनिरिक्षक यांची निर्दोष सुटका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लाचेची मागणी केली या आरोपाखाली न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात आरोप सिद्ध न झाल्याने पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांनी निर्दोष सुटका करण्यात आली. सविस्त असे कि, सेवा निवृत्त पोलीस अधीकारी महेबुब खान पठान रा. भंडारा यांनी दि. १६/१२/२०१५ रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे पोलीस उपनिरिक्षक अमोल तुळजेवार यांचे विरुध्द लेखी तक्रार दिली होती. तक्रारकर्ता यांचा मुलगा इस्माईल खान व त्याचे दोन मित्राविरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे भां.द.वि. चे कलम ३६५ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास आरोपी अमोल तुळजेवार यांचेकडे होता. सदर गुन्ह्याचे “क” फायनल करण्याकरीता लाच रक्कम म्हणुन त्यांनी रु. ९०,००० रुपयाची मागणी केलेली आहे, अशी तक्रार त्यांचे विरुध्द करण्यात आली होती. सदर प्रकरणात तत्कालीन विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कदम यांनी अभियोग चालविण्यास मंजुरी प्रदान केली होती.

प्रकरणाचा तपास रमाकांत कोकाटे, पोलीस निरिक्षक नागपुर यांनी करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. उपरोक्त प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण सात साक्षदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात आरोपी पैशाची मागणी करेल कि नाही याकरीता एकूण पाच पंचनामे तपासी अधिकाºयाने केलेले होते, तसेच आरोपीने सदर प्रकरणात सेटलमेंट करण्याकरीता छाया देशपांडे हिला रु.१०,००० द्यावे लागेल असे तपासी अधिकाºयांनी नमुद केले, परंतु छाया देशपांडे हिची या प्रकरणाला समंती होती का, तसेच सदर प्रकरणात छाया देशपांडे हिचे बयान सुध्दा तपासी अधिकाºयाने नोंदविले नव्हते. सदर प्रकरणात हरीष कोकाटे यांना समजोता करण्याकरीता पैसे श्रीमती देशपांडे यांना द्यावयाचे नव्हते, त्यांना फक्त पैशे आरोपीलाच द्यायचे होते. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी झालेल्या संभाषणाची हॅशवॅलू ज्या अधिका-यांनी काढली त्या अधिकाºयाची सही हॅशवॅलू सटीर्फीकेटवर नसणे हे या प्रकरणात फार मोठी तफावत होती. तसेच सदर प्रकरणात तक्रारकर्ता महेबुब खान पठान याने कबुल केले कि, त्यांचे मुलाविरुध्दचे प्रकरण बंद करण्याकरीता आरोपीने त्यांना स्वत:करीता लाच रक्कम रु.९०,००० मागीतली नाही.

तपासी अधिकाºयांनी वारंवार कसेही करुन आरोपीने लाचेची मागणी करावी याकरीता सापळा रचला, जेणेकरुन कशाही प्रकारे आरोपी सापडला जाईल, परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही, तसेच तक्रारी यांना कशाही प्रकारे आरोपीवर दबाव तंत्राचा उपयोग करावयाचा होता. कारण, त्याचे मुलाविरुध्दचे तपास करण्याचा अधिकार आरोपीकडे होता. या संपुर्ण घडामोडी वरुन सरकारी पक्ष आरोपी विरुध्दचे आरोप सिध्द करु शकले नाही, त्यामुळे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मार यांनी आरोपी पोलीस उपनिरिक्षक अमोल तुळजेवार यांची उपरोक्त प्रकरणातुन निर्दोष सुटका केली. आरोपी तर्फे अ‍ॅड. राजेश राऊत यांनी बचाव केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *