गोंदियाचे प्रशिक्षणार्थी विमान उतरले ‘टॅक्सी वे’ वर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नागपूूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २१ नोव्हेंबर रोजी वैमानिकाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि विमान धावपट्टीऐवजी मिहानमधील ‘टॅक्सी-वे’ वर उतरवले. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. गोंदियाच्या फ्लाईंग क्लबचे प्रशिक्षण देणारे हे विमान होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या इंदिरा गांधी उड्डाण अकादमीच्या महिला वैमानिकाने गोंदियाच्या बिरसी विमानतळा वरून झेप घेतली होती. हे विमान नागपूर विमानतळावर उतरून परत गोंदियाला जाणार होते. दरम्यान, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला. विमानाचा शोध सुरू झाला, तेव्हा हे विमान मिहानमध्ये उतरल्याचे समजले. फ्लाईंग क्लबचे अधिकारी मंगळवारी दुपारनंतर नागपुरात दाखल झाले. रात्री आठ वाजताच्या सुमारास या विमानाने गोंदियाकडे झेप घेतली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *