जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आयोजित बाईक रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना २१ आॅगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य कार्यकारणी सभा पार पडली. या सभेत राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांना एन.पी.एस. योजना रदद करून हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या मागणीबाबत अत्यंत महत्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्र शासन या मागणीबाबत अत्यंत उदासीनतेने कार्यवाहीची पावले उचलताना दिसून येत आहे. कर्मचाºयांचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एनपीएस बाबत विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्यासाठी शासनाने सकारात्मक विचार करून अर्थ राज्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी अभ्यास समितीची स्थापना केली होती. या समितीच्या दोन किंवा तीन बैठका संपन्न झाल्या. परंतु मागील साडेतीन वर्षांचा कालावधी लोटून सुद्धा राज्यातील एनपीएस धोरणा संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचारी शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष आहे.

केंद्र शासनाचे आवाक्यातील सेना दलाला जुनी पेन्शन योजनाच कायम ठेवण्यात आली आहे. खासदार-आमदार यांना आजही नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू झालेली नाही. यावरून नवीन पेन्शन योजना कर्मचाºयांचे हिताची नाही हे ध्वनीत होते. दुसरे असे की एनपीएस योजनेमार्फत मिळणाºया संभावीत पेन्शन योजनेचे लाभाचे स्वरूप कोणतीही शाश्वती न देणारे आहे. कारण फंड मॅनेजरला पेन्शनच्या जमा रकमेतून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची मुभा आहे. सामाजिक सुरक्षेसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची हिताची आहे, अशी सर्व कर्मचारी शिक्षकांची पक्की धारणा आहे. अलीकडेच राजस्थान, छत्तीसगड, गोवा, झारखंड या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचाºयांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. त्यामुळे वरील राज्य प्रमाणे एनपीएस बाबतचे सुधारित धोरण महाराष्ट्र राज्यात लागू केले जाईल, असा विश्वास कर्मचाºयांमध्ये आहे. त्या अनुषंगाने राज्यातील एन.पी.एस. धारक कर्मचारी बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ ते ३ या वेळात राज्यव्यापी बाईक रॅली काढण्यात आली. भंडारा जिल्ह्यात सदरील बाईक रॅली संघटनेचे जिल्हा कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, भंडारा चे प्रांगणात दुपारी २ वाजता सुरू होवून त्रिमुर्ती चौक – नागपूर नाका – राजीव गांधी चौक खांबतलाव मार्गे शास्त्री चौक – (परत) गांधी चौक – कुकडे हॉस्पीटल मार्गे मुस्लीम लायब्रेरी चौक – जे. एम. पटेल कॉलेज रोड – त्रिमुर्ती चौक – संघटनेचे जिल्हा कार्यालय, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, भंडाराचे प्रांगणात बाईक रॅलीची सांगता व समारोप होणार आहे.

याप्रसंगी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी एन.पी.एस.धारक कर्मचाºयांना संबोधित केले. त्यानंतर विषयांकीत मागणीबाबतचे निवेदन मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना जिल्हाधिकारी, भंडारा यांचे मार्फत सादर करण्यात आले. यावरही शासनाने लक्ष देवून मागणीचा विचार न केल्यास आगामी काळात जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. या बाईक रॅलीचे नैतृत्व रामभाऊ येवले, अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा भंडारा यांनी केले. प्रमुख उपस्थिती माधवराव फसाटे, शिवराम भोयर, अतुल वर्मा, शिवपाल भाजीपाले, केसरीलाल गायधने, मनीष वाहने, संतोष मडावी, विनोद राठोड, राजेश डोर्लीकर, प्रशांत गजभिये, श्याम राठोड, दिलीप रोडके, सुनील मदारकर, जाधवराव साठवणे, शिवशंकर साखरवाडे, लक्समन केवट, संदीप फुंडे, उमेश सिंगनजुडे, सिद्धार्थ गजभिये, अश्विनी बोदेले, आनंद दोनाडकर, आशिष भुरे तसेच मोठ्या संख्येत राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर, जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *