सेवा पंधरवड्यानिमित्त सर्व तहसील कार्यालयात फेरफार अदालत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आयोजित करण्यात आला असून सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आज जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया तहसील कार्यालयात आयोजित फेरफार अदालत कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. जनसेवा आपले कर्तव्य असून केवळ सेवा पंधरवडाच नव्हे तर आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकांना सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांचे प्रश्न व समस्यांचा वेळेत निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांना विहित मुदतीत सेवा प्रदान कराव्या असे अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले. फेरफार अदालतचे यशस्वी आयोजनासाठी तालुकानिहाय सनियंत्रण अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात अपर जिल्हाधिकारी राजेश खवले आमगाव, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे सडक अर्जुनी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे गोरेगाव, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी सालेकसा, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील गोंदिया, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तिरोडा, उपविभागीय अधिकारी देवरी अनमोल सागर देवरी व उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी अर्जुनी मोरगाव यांचा समावेश आहे.

गोंदिया तहसील कार्यालयात आयोजित फेरफार अदालतमध्ये उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार संतोष खांडरे, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यावेळी उपस्थित होते. या फेरफार अदालत मध्ये प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटार करण्यात आला. याचबरोबर गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी व आमगाव तहसील कार्यालयात सुद्धा आज फेरफार अदालत आयोजित करण्यात आली. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी उपस्थित राहून प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र वितरित केले. आमगाव येथे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांनाशिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले. देवरी येथे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांनी फेरफार अदालतला मार्गदर्शन करून वनहक्क पट्टे वाटप केले. सडक अर्जुनी येथे आयोजित फेरफार अदालत कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांनी भेट दिली तर गोरेगाव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अदालतला उपजिल्हाधिकारीस्मिता बेलपत्रे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सात बाराचे वाटप करण्यात आले. सेवा पंधरवाड्यानिमित्त महसूल विभागाच्या वतीने आज सर्व तालुक्यात आयोजित फेरफार अदालतमध्ये लाभार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने नागरिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यावेळी सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते. फेरफार अदलतीमुळे लाभार्थ्यांच्या प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा झाला. तसेच शिधा पत्रिका, रेशन कार्ड, जातीचे दाखले, वन हक्क पट्टे मिळाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *