गोदिया यथे निवासी डाक्टरची आत्महत्या

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेने महाविद्यालयातील प्रशासनात खळबळ उडाली आहे. भूषण विलास वाढोणकर ( २३ ) रा. चांदूर रेल्वे जि. अमरावती असे मृतकाचे नाव आहे. तरुण डॉक्टर गेल्या काही दिवसापासून नैराश्यात होता आणि कुणाशी काहीही बोलत असल्याच्या त्याच्या सहकारी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी घटनस्थळाला भेट दिली व वसतिगृहातील इतरांना विचारपूस केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.