घरगुती वादातून चुलत सासºयाने केली सूनेची हत्या

रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवरी येथील घरगुती वादातून आपले चूलत सून्येची हत्या करून तिचे सासुस जखमी केल्याची घटना घडल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सह पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन त्वरित योग्य ती कारवाई केल्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नसून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास पीएसआय सुखदेव राऊत करीत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले देवरी गावातील आरोपी प्रीतमलाल सहेसराम ठाकरे वय ५५ वर्ष याने घरगुती वादातून आज दुपारी बारा वाजता चे दरम्यान त्याची चुलतसुन मृतक सुनिता दिनेश ठाकरे वय ३५ वर्ष हिचे मानेवर व गळ्यावर कुºहाडीने सपासप वार केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून तिची सासू रेमनबाई प्रेमला ठाकरे वय ६० वर्ष हिचे डावा कान कापला गेल्याने ती जखमी झाली असून तिचेवर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांना होताच त्यांनी दवनीवाडा पोलीस निरीक्षक सतीश जाधव ,पोलीस उपनिरीक्षक सुखदेव राऊत, सुवर्णा मालाधरे, मिल्किराम पटले, पोलीस कर्मचारी मोहन टेंभेकर,पिपरेवार ,राजेश पारधी यांचे सह घटनास्थळ गाठून मृतकाचे प्रेताचे पंचनामा करून व जखमी उपचाराकरता रुग्णालयात दाखल करून मृतकाचे प्रेत शव विच्छेदनाकरता रुग्णालयात पाठवून आरोपी प्रीतमलाल ठाकरे यास ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव राऊत करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *