‘त्या’ आरोपींच्या संपत्तीची सखोल चौकशी करा!

भंडारा : जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशनअंतर्गत गोतस्करी प्रकरणात नवनियुक्त जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असुन या प्रकरणात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाºयांना निलंबीत करीत कायदा मोडणाºया कुणाचीही गय केली जाणार नाही मग तो पोलीस अधिकारी / कर्मचारी असा संदेश जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी दिला.त्यांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायीकांमध्ये धडकी भरली असुन सर्वसमान्य जनतेचा पोलीस विभावरील विश्वास आणखीनच दृढ होईल यात तिळमात्र शंका असे मत माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले आहे. सदर प्रकरणात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच निलंबीत पोलीस अधिकारी-कर्मचाºयावर सुध्दा खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री यांना निवेदनातुन केली आहे. सदर गोतस्करी आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे एका होमगार्डच्या माध्यमातुन गोतस्करांक-डुन आर्थिक देवाण-घेवाण करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. होमगार्डच्या खात्यात गोतस्करांद्वारे आॅनलाइन पेमेंट पाठविले जावुन त्याच्यामाध्यमातुन संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचारी व अटकेतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या खात्यात पैसे वळते केले जात होते. करीता संबंधीत सर्वांच्या बँक खात्याची तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे संबंधित निलंबित पोलिस अधिकारी व कर्मचाºयावर खंडणीचा गुन्हादाखल करण्यात यावा अशी मागणी चरण वाघमारे निवेदनातुन केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *