बनावटी फेविक्विक विकणाºया ३ व्यापाºयांना अटक!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहरात बनावटी पिडीलाईट कंपनीचे फेविक्विक ट्यूब बाळगून त्याची विक्री करणाºया तीन व्यापाºयांना १४ मार्च रोजी अटक केली. एक आरोपी फरार आहे. श्याम मोहनलाल बजाज (५४, वर्ष रा.सिंधी कॉलोनी, दीपक बच्चुमल लिलवानी (२४ रा. कुंभारटोली) व विवेक हरिशंकर गुप्ता ट्रेडर्सचे मालक श्याम मोहनलाल बजाज, दीपक बच्चुमल लिलवानी व विवेक हरिशंकर गुप्ता यांना बनावटी फेविक्वीक विक्री करताना तसेच दुकानात बाळगताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. तसेच श्याम बजाज व दीपक लिलवानी यांच्या बजाज ट्रेडर्स दुकानात व विवेक यांच्या घरातून एकूण ८८९० रुपए किमतीचे बनावटी फेविक्विक ट्यूब जप्त केले. (३४, रा. पीए राईस मिल जवळ असे तपासादरम्यान प्रकाश खत्री रा. बिलासपुर अटक केलेल्या व्यापाºयाची नावे असून प्रकाश खत्री रा. बिलासपूर हा फरार आहे. उत्तरप्रदेशातील वजीरपूर येथील फियार्दी मो. तौकीर मो. कालेखान चौधरी यांनी सेमिता लिगल अ‍ॅडव्होकेट अँड सॉलिसिटर कंपनीतर्फे नोयडा येथील पिडीलाईट व फेविक्विक कंपनीचे बनावटी साहित्य गोंदिया येथे विक्री होत असून त्यामुळे या कंपनीचे नुकसान होत असल्याची तक्रार गोंदिया पोलिसात दाखल केला होती.

याअनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेवून कायदेशीर कार- वाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी आपल्या पथकासह प्रकरणाची संपूर्ण शहानिशा करून व खात्रीशिर माहितीच्या आधारे १४ मार्चच्या सायंकाळी बजाज (छ.ग.) हा गोंदिया येथे आपल्यासह इतरांना सुध्दा बनावटी माल पुरवित असल्याची माहिती तिघांनी दिल्याने त्यांच्याविरूद्ध कॉपी राईट अ‍ॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ५१६३, ६३,६५ प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ अन्वये कारवाई करुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *