अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाºया आरोपीला ३ वर्षाचा सश्रम कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाºया आरोपीला भंडारा जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.दिपक गोपीचंद मेश्राम वय २५ वर्षे रा.गोसे बु.त.पवनी जि.भंडारा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन पिडीत मुलगी ही १२ वी मध्ये शिक्षण घेत होती. दिनांक १७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ०४.३० वाजता अल्पवयीन पिडीता ही एकटीच घरी असतांना आरोपी दिपक मेश्राम याने पिडीतेच्या घराच्या दाराला गोटे मारुन दरवाजा उघड असे म्हणत होता घरच्या पायरीवर बसला . त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही घाबरुन मागील दरवाजा बाहेरुन लावला तेव्हा आरोपीने अल्पवयीन फियार्दीचा हात पकडून तिला घट्ट पकडले.

दरम्यान पिडीतेची आई आल्याचे बघुन आरोपीने पिडीतेला सोडुन दिले व फियार्दीला पळवुन नेण्याची धमकी दिली. त्यामुळे अल्पवयीन पिडीतेने घाबरुन पोलीस स्टेशन अडयाळ येथे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलीसांनी आरोपीविरोधात कलम ३५४(अ)(१)४५२ भांदवि. सहकलम ८, १२ पोक्सो अ‍ॅक्ट अन्वये वरुन गुन्हा नोंदविला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भाग्यश्री कुलकणी व म. पो. हवा. हर्षा मांढरे यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळ गाठुन तपासाला सुरुवात केली. प्राथमीक तपासादरम्यान पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा तयार करीत साक्षदार गोळा करीत त्यांची यांना विचारपुस करुन आरोपीस अटक केली.

तपासादरम्यान आरोपी विरुध्द योग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कलम कलम ३५४ (अ) ४५२ भांदवी सहकलम सहकलम ८, १२ पोक्सो लैगिक अपराधापासून बांलकाचे संरक्षण आरोपाखाली खटला क्रमांक १०५/१९ देवुन सदर गुन्हयाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश श्री. पी. बी. तिजारे सा. यांचे न्यायालयात चालविण्यात आली. सरकारी पक्षातर्पेष्ठ सहा. सरकारी अभियोक्ता श्रीमती दुर्गा तलमले, सत्र न्यायालय भंडारा यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले. दरम्यान आरोपीवर लावण्यात आलेला दोष सिध्द झाल्याने दिनांक १५ मार्च २०२३ रोजी पुराव्यांचे आधारे आरोपी दिपक गोपीचंद मेश्राम याला कलम ८ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास ५,०० रु. दंड व ादंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. कलम १२ मध्ये १ वर्षे सश्रम कारावासासह ५०० रु. दंड व द्रव्यदंड न भरल्यास १ महिने साधा कारावास तसेच कलम ४५२ मध्ये १ वर्षे सश्रम कारावास ५०० रु. दंड व ादंड न भरल्यास १ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक भंडारा श्री ईश्वर कातकडे, अड्याळ पो.स्टे.चे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक श्री. मिसाळे , पोलीस नायक शिल्पेन्द्र मेश्राम यांचे मार्गदर्षनात यांनी योग्य पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज सांभाळले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *