अन्न विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा अंतर्गत तुमसर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबरवाही येथील मौजा येरली येथे गोंदिया एज्युकेशन सोसायटी आश्रम शाळा येरली शासन अनुदानित आश्रम शाळा आहे.मौजा येरली येथील लोकसंख्या ३७४७ आहे. सदर आश्रम शाळेमध्ये मुले २१३ व मुली १९८ असे एकुण ४३१ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २४ आॅगस्ट २०२३ रोजी मुले १४९ व मुली १५७ असे एकुण ३१६ विद्यार्थी उपस्थित होते. तसेच २४ आॅगस्ट २०२३ ला एकुण ३१६ विद्यार्थ्यांनी दुपारी १ वाजता जेवण केले.

आश्रम शाळेमध्ये त्यांच्या जेवणामध्ये आलू वाटाण्याची भाजी, भात, व वरण देण्यात आले होते. तसेच संध्याकाळी ५ वाजता च्या सुमारास काही विद्यार्थ्यांनी तापासारखे लक्षणे जाणवू लागले. त्यावेळी सदर बाबीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबरवाही यांना संध्याकाळी ५.३० वाजता च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबरवाही अंतर्गत आरोग्य पथक आश्रम शाळेत दाखल झाले. यावेळी आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागले त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.त्यामध्ये एकुण ४९ रुग्णांना असा त्रास असल्याचे जाणवले.

सदर विद्यार्थ्यापैकी १ मुलगा व ४२ मुली असे एकुण ४३ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले. २३ विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात डीहायड्रेशन असल्यामुळे त्यांना रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालय भंडारा येथे सेवा संदर्भात करण्यात आली. वरील विद्यार्थ्यापैकी १ मुलगा व २२ मुली असे एकुण २३ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे २० विद्यार्थी भरती असून त्यांची आरोग्यस्थिती ठीक आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे एकुण २३ विद्यार्थी भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु असून सद्यस्थितीत प्रकृती धोक्या बाहेर आहे. अन्न विषबाधा बाबतची जिल्हास्तरावरुन जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. तसेच अन्नाचे नमुने व इतर कारणांचा शोध घेणे सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये साथ उद्रेक आटोक्यात असून साथ उद्रेकाची चौकशी सुरु आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुवर जिल्हा परिषद, भंडारा यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *