वीज पडून बैलजोडी ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी जांब : भंडारा जिल्ह्यात दि.२२ एप्रिल २०२४ रोजी सकाळपासूनच मेघ दाटून काळोख पसरला होता. अचानक अवकाळी पावसाने पून्हा जोरदार मुसंडी मारल्याने शेतकºयांच्या मका पिकासह उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे. मोहाडी तालुक्यातील जांब शेतशिवारात सकाळी ९ वाजता दरम्यान शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीवर वीज कोसळली. त्यात बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने सुभाष बोरकर नामक शेतकरी बैलजोडी बांधून शेतात काम करण्यास गेला असता सुदैवाने बचावला.

यात सदर शेतकरी पशूपालकाचे मोठे नुकसान झाले असून शेती कसण्याची समस्या निर्माण झाली आहे. पशूवैद्यकीय अधिकारी, तलाठी, ग्रा.पं.सरपंच, सदस्य तसेच आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकºयाला प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयाकडून जोर धरू लागली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *