करडी ते मुंढरी रस्त्यासाठी २७ ला काँग्रेस करणार रास्ता रोको

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील मौजा करडी ते मुंढरी(बु)रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने मंगळवार दि.२६ जुन २०२३ ला रस्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन मोहाडी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांना देण्यात आले. प्राप्त निवेदनानुसार, करडी ते मुंढरी (बु) रस्त्याचे काम अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. अनेक दिवसापासून ह्या रोडच्या मध्य भागामध्ये मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी मुरूम उघड्यावर टाकून त्या ठिकाणी अनेक वेळा मोटार सायकल स्लीप होऊन अपघात झालेली आहेत. अश्या प्रकारच्या अनेक जीवघेण्या अडचणी निर्मान होत असल्याने मोहाडी तालुका काँग्रेस कमेटी व करडी सर्कल काँग्रेस कमिटी तर्फे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांना गुरूवार दि. २२ जून २०२३ ला देण्यात आले.

येत्या ४ दिवसांत रत्याचे कामसुरू करावे अन्यथा २७ जून २०२३ला सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करडी येथील मुंढरी (बु) रस्त्याच्या मुख्य चौकात करण्यात येईल, असा ठणठणीत इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली रमेश पारधी, सुभाष आजबले, प्रेम वणवे, राजेश हटवार, विनीत देशपांडे, राजेश हटवार, देवेंद्र ईलमे, गजानन झंझाड, विजय शहारे, श्रीकांत येरपुडे, देवाश्री शहारे, ग्यानिराम शेंडे, संजू गोसेवाडे, महेश निमजे, केशव शेंडे, रंजीत सेलोकर, भूपेंद्र साठवणे, संतोष शेंडे, रामप्रसाद नेरकर, कैलाश मते, महेश पराते, अरविंद मनगटे, लोकेश रोटके, विशाल सिंगंनजुडे, श्रावण डोये, शुभम धुमनखेडे, लक्ष्मण ठोंबरे, रवि थोटे यांनी दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.