नागझिरा अभयारण्याकडे जाणाºया रस्त्याची दुरावस्था

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नागझिरा अभयारण्य मार्गावरील ग्राम जमनापूर पिटेझरी आलेबेदर येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून बुद्ध कुटी जवळ असलेल्या नाली वरील रस्ता पूर्णत: उखडला असल्यामुळे या ठिकाणी नियमित लहान-मोठे अपघात होत आहेत. नागझिरा अभियारण्य कडे जाणाºया मार्गावर पर्यटकांची मोठ्या संख्येने ये जा सुरू असते जवळपास १५ किलोमीटर डांबरीकरण केलेल्या या मागार्ची निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने रस्त्याची दुरावस्था झालेली आहे यामुळे लहान मोठे अपघात नेहमी होत असतात.

दीड वर्षापुर्वीच जमनापूर ते पीटेझरी मार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनविण्यात आला असून या कामाचे कंत्राट तिरोडा येथील एका कंत्राट दाराला मिळाले होते परंतु या मार्गावर रस्ता बनवितांनी मोठ्या प्रमाणावर अनियमिता तसेच कामाची गुणवत्ता बांधकाम विभागाच्या गुणवत्तेनुसार नसल्यामुळे रस्त्यावर बºयाच ठिकाणी खड्डे पडले असून हा मार्ग वाहतुकीसाठी उपयुक्त राहिला नाही याच मार्गाने नागझिरा अभयारण्य ,तुडमापुरी ,वडेगाव ,खांबा,पिटेझरी ,वलमाझरी , खांबा, जांभडी, बोरगाव ,एकोडी कोसमतोंडी ,खांबा, रेंगेपार ,सातलवाडा, तिरोडा, गोंदिया, तुमसर करिता मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते परंतु कामाची गुणवत्ता शासकीय निकषानुसार नसल्यामुळे हा मार्ग दोनतीन महिन्यातच उखडून गेला त्यामुळे या मार्गावर बरेच प्रमाणावर अपघाताची संख्या वाढली असून आलेबेदर येथील बुद्ध कुटी जवळील नाली वरील रस्त्याचे डांबरीकरण करताना या ठिकाणी रोलर ने घोटाई केली नसल्यामुळे नाली वरील रस्ता नेहमी फुटून जातो त्यामुळे या नालीवर बरेच अपघात झाले असून काही लोकांना तर आपला जीव सुद्धा गमवावा लागला याबाबत अनेक वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली.

त्यानंतर दीड-दोन महिन्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराने थातूरमातूर नाली वरील रस्ता सुरळीत करण्याच्या केविलवाना प्रयत्न केला परंतु सदर नाली उतार भागात असल्यामुळे या ठिकाणी गिट्टी टाकून रोलरने दाबल्यानंतरच डांबरीकरण करायला हवे तेव्हाच या नालीवरील रस्ता वाहतुकीकरिता सुरळीत राहील त्यामुळे संबंधित कंत्राट दराने व संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी या बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ आलेबेदर येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जमनापूर् वडेगाव वलमाझरी येथील नागरिकांनी केली आहे. तात्काळ या नाली वरील रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर स्थानिक नागरिकांकडून मोठे जन आंदोलन करण्यात येईल अशी सूचना स्थानिक नागरिकांनी दीली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *