तलवारीच्या धाकावर जबरी लुटमार करणाऱ्यांना ग्रामस्थांनी दिला चोप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : रात्रीच्या वेळेस जेवणानंतर गावाजवळ फेरफटका करीत असलेल्या इसमावर हल्ला चढवून तलवारीच्या धाकावर जबरन लूटमार करणार्यांना ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना तालुक्यातील ग्राम खंडाळा येथे उघडकीस आली आहे. गावकºयांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली असून तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील ग्राम खंडाळा निवासी विनेंद्र नेवारे हे आपल्या मित्रासह २१ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता जेवणानंतर गावाबाहेरील रस्त्यावर फेरफटका मारत होते. याचवेळी बिना नंबरच्या बजाज सिटी १०० मोटरसायकलवर आरोपी जितेश कापगते ३५ वर्ष राहणार खंडाळा रणजीत उर्फ डॉन वैद्य ३२ वर्ष राहणार खंडाळा व सडक अजुनी तालुक्यातील बामणी सावंगी निवासी विशाल ब्राह्मणकर तिघेही विनेन्द्र जवळ आले व हल्ला चढविला. यातील आरोपी विशाल ब्राह्मणकर याने तलवारीचा धाक दाखवून विनेन्द्रला कापून टाकण्याची धमकी दिली व जितेश कापगते याने विनेंद्र चा मोबाईल हिसकावला अचानक घडलेल्या घटनेमुळे विनेन्द्र व त्याच्या मित्रांनी आरडा ओरड सुरू केली.

जवळच असलेल्या गावकºयांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळाकडे धाव घेतली व पळून जाणाºया तीनही आरोपींना पकडण्याकरिता गावकºयांनी धाव घेतली असता तिघेही आरोपी गाडीवरून पडले यातील आरोपी रंजीत उर्फ डॉन हा गावकºयांच्या तावडीतून निसटला व फरार झाला तर विशाल ब्राह्मणकर व जितेश कापगते या दोघांना गावकºयांनी पकडून चांगला चोप दिला व घडलेल्या घटनेची सूचना पोलिसांना दिली. सूचना मिळताच ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय धनराज सेलोकर पोलीस हवालदार राजेंद्र कुरुडकर पोलीस कर्मचारी अमित वडेट्टीवार राजेश बांते सुरेश काकडे सुशील कोल्हे सचिन कापगते यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दोन्ही आरोपींना अटक केली व रणजीत उर्फ डॉन याचा शोध घेऊन २२ सप्टेंबरला खंडाळा येथून अटक केली तिघांविरुद्ध जबरी चोरी च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तीनही आरोपींकडून चोरण्यात आलेल्या तीन मोटरसायकल सुद्धा पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय सेलोकर करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *