प्रधानमंत्री पोषणशक्ती परसबाग योजनेत खैरी/घर. जि.प. शाळा तालुक्यातून प्रथम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत उत्कृष्ठ परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये लाखांदूर तालुक्यातून जिल्हा परीषद प्राथमिक शाळा खैरी/घर. ला प्रथम पुरस्कार मिळाला असून जिल्हा परीषद भंडाराच्या वतीने ५ हजार रु. रोख रक्कम शाळेला देण्यात आले. लाखांदूर तालुक्यातील केंद्र विरली, पं.स. लाखांदुर अंतर्गत येत असलेली खैरी /घर. शाळेत उत्कृष्ठ परसबाग तयार करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आय.एन. दोडके, स. शि. सि. व्ही. अहीर यांनी गटशिक्षणाधिकारी अंबादे, केंद्रप्रमुख लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले. तसेच विशेष म्हणजे शाळेचा परिसरविकसीत करण्यासाठी व परसबाग निर्मितीसाठी मागील २ वर्षापासुन प्रयत्न सुरु होते. यामध्ये संरपंचा सौ. वर्षा कोरे, ग्रा.पं. सदस्य, सेवक कोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश चुटे व सर्व सदस्यगण, अंगणवाडी सेविका सौ. मंगला फुंडे, मदतनिस प्रतीभा कोरे, सरीता नान्हे या सर्वांचे व सर्व गावकºयांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे सदर परसबाग फुलविण्यात शाळेतील विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *