महात्मा फुले जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोतसवा वर्षानिमित्त आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतीराव फुले यांची जयंती ११ एप्रिला रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना केली आहे. निवेदनानुसार, महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय ही मुल्ये विश्वात रुजविण्यात आपले जीवन समर्पित केले आहे. मराठी भाषेत पहिले पोवाड्यारुपीशिवचरित्र लिहण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांची लपलेली समाधी शोधण्याचा व शिवजयंती सुरु करण्याचा मान महात्मा फुले यांनाच जातो.
शुद्र-अतिशुद्रांच्या कल्याण्यासाठी झटणाºया महात्मा फुलेंना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीगुरुस्थानी मानून भारतीय संविधान लिहले. डॉ. आंबेडकर जयंतीला शासकीय सुट्टी मंजूर आहे. मात्र त्यांचे गुरु महात्मा फुले यांच्या जयंतीला शासकीय सुट्टी नाही. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोतसवी वर्षानिमित्त महात्मा फुले जयंती ११ एप्रिलला शासकीय सुट्टी जाही करण्यात यावी. या मागणीचे निवेदन जिल्हा ओबीसी कृषी समिती, जिल्हा ओबीसी सेवा संघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *