कॉग्रेसतर्फे प्रशांत पडोळे तर भाजपतर्फे सुनिल मेंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, याचा शोध लागला नाही. भाजपा सरकारच्या काळात देशातील सैनिक सुरक्षित नाही आणि शेतकरीही सुरक्षित नाहीतअसा हल्लाबोल करत लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सतिश चतुर्वदी, माजी मंत्री बंडुभाऊ सावरबांधे,माजी खा.मधुकर कुकेडे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.