लाखनी पं. स.मध्ये ५ टक्के,ताबडतोब ओके !

रवी धोतरे लाखनी : पंचायत समितीत सध्या भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण झाले असून प्रत्येक काम करण्यासाठी पाच टक्के द्या आणि ताबडतोब फाईल ओके करा असा दंडूक झाला असल्याने तालुक्यातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे या पाच टक्के ची कल्पना येथील आमदार नाना पटोले यांच्याकडे सुद्धा करण्यात आली असून त्यांनी त्यासाठी दोषीला योग्य तो धडा शिकवा असे निर्देश दिले असल्याने आता तालुक्यातील जनता आपापल्या परीने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. लाखनी पंचायत समितीला पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत कोट्यावधी रुपयाचे निधी प्राप्त झाले. त्यासाठी आमदारांनी विशेष प्रयत्न केले परंतु त्या निधीवर डल्ला मारण्याचा उद्देश असल्याने पंचायत समिती अंतर्गत येणाºया ग्रामपंचायतीमधील कामांची कोणतीही निविदा न काढता खंड विकासअधिकाºयांच्या आशीर्वादाने सर्व कामे विना निवेदनुसार करण्यात आली यासंबंधी पंचायत समिती लाखनीला विचारणा केली असता त्यांनी निविदा न काढल्याचे जाहीर कबुली दिली त्यामुळे या निधीवर डल्ला मारणाºयांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

येथील नवनियुक्त पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना संबंधित प्रकरणी तक्रार केली असून त्या तक्रारीची दखल जिल्हा परिषद च्या स्थायी समिती च्या बैठकीत समाज कल्याण सभापती श्री मदन रामटेके यांनी प्रकरण उचलून धरल्याची माहिती आहे आणि संबंधित खंडविकास अधिकाºयाला निलंबित करण्याची मागणी सभेत करण्यात आली असल्याची चर्चा प्रशासकीय वतुर्ळात आहे. खंड विकास अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीत येणाºया ग्रामपंचायत मधील सर्व कामांची जाहीर निविदा वर्तमानपत्रात प्रकाशित करूनच पुढील कारवाई करावी असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र सुद्धा दिले परंतु पाच टक्के ताबडतोब ओके ची भूमिकेत असलेल्या विकास अधिकाºयांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवत व पंचायत समिती अंतर्गत येणाºया ग्रामपंचायत कामाची निविदा प्रकाशित करू दिल्या नाही कोरोना काळात अनेक उलट फेर करून पंचायत समितीमध्ये अनेक शासकीय योजनांचा निधी प्राप्त झाला त्याही निधीवर ताबडतोब ओके ची कारवाई करत तेही कामे निविदा विना झाले असल्याची माहिती आहे आता निवडणुका होऊन जनप्रतिनिधीकडे कारभार गेल्यावर ताबडतोब ओके ची सवय जडलेल्या खंडविकास अधिकाºयाने जनप्रदिनिधींना विश्वासात न घेता कामे पार करण्याचा सपाटा सुरू केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पंचायत समिती लाखनी येथे उमेद च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *