८८ वर्षांपासून खंडाळ्यात ‘एक गाव एक गणपती’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील खंडाळा (बोंडे) गाव आहे. या गावात मागील ८८ वर्षांपासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविल्याने खंडाळा या गावचे नाव साकोली तालुक्यात चुलबंद नदीचा पावन स्पर्श आणि वटेश्वरांचे आशीर्वाद या गावाच्या पाठीशी आहेत असे म्हणायला हरकत नाही. सर्वधर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदणाºया या गावाने सलग ८८ वर्षांपासून एक गाव एक गणपती ही संकल्पना जोपासलेली आहे. त्यामुळे साकोली तालुक्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. गेल्या ८८ वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करीत असताना कुठलेही गालबोट लागले नाही, हे या गावाचे खास वैशिष्ट्य. परिणामी या गावाने ही परंपरा जोपासली म्हणण्यापेक्षा येणाºया नवीन पिढीने ती रुजवली. १९३४ पासून या गावात दरवर्षी श्री गणरायाची स्थापना करण्यात येते. यानिमित्ताने सर्व समाजाचा समन्वय असलेल्या या गावात प्रत्येक उत्सव साजरा करण्यात येतो. लोकसहभागातून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या गावातील आतापर्यंत झालेल्या १४ सरपंचांचा हा गणपती साक्षीदार आहे. १९५३ पासून या गावाने लांजेवार परिवारातील सात सरपंच दिल्याचाही हा गणपती साक्ष देतो. सध्या विद्यमान सरपंच देवेंद्र वसंतराव लांजेवार आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली गणेशोत्सव सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *