डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- पनके

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश घालून भारताचे ४९ वे मुख्य न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यावेळी आपल्या गुरुजनांना चरणस्पर्श केला तसेच शील संवर्धन हे शिक्षकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून शिक्षकशिक्षिकांनी यांचे भान ठेवून सदैव प्रवित्र कार्य करावे तसेच आदर्श शिक्षक असणाºया डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रमोद पनके यांनी केले. ते नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती तथा शिक्षक दिनानिमित्त सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रमोद पनके होते. प्रमुख पाहुणे म्हणून नविन मुलींची शाळा संस्थेचे सचिव अ‍ॅड. एम. एल. भुरे, सहसचिव शेखर बोरसे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शिला भुरे, नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा चित्रिव, उपमुख्याघ्यापकनिलु तिडके, पर्यवेक्षक कैलास कुरंजेकर, सुरेखा डुंभरे, पा. वा. नविन मुलींची शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गजभिये, अरुणोदय बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका मीरा धास्कर, पा. वा. नविन मुलींची शाळेच्या सेवा निवृत्त मुख्याध्यापिका करूणा इन्कने, वीणा कुर्वे उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वतीच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून व्दिप प्रज्वलित करण्यात आले. व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच हुमीशा डुंभरे, आराध्या देशकर, साईश्री हटवार, सिध्देश पनके, समिक्षा कारेमोरे, प्रांजल मालगावे, विलास खोब्रागडे, महेंद्र बडवाईक, विभा नानोटी व श्रध्दा रामेकर यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची महंती व गीत सादर केले. शिक्षक म्हणजे समुद्र ज्ञानाचा आणि पावित्र्याचा शिक्षक – शिक्षिका पवित्र पदावर संस्थेद्वारे संचालित शाळेत कार्यरत आहेत. दर्जेदार शिक्षण, सुसंस्कार, कौशल्य विकास, कला, क्रीडा व सांस्कृतिक विकासात्मक ध्येय विद्यार्थी-विद्याथीर्नी पर्यंत पोहचविण्याकरीता आपली इच्छाशक्ती, ध्येयशक्ती, दृढनिश्चय, कर्तव्यनिष्ठा, समता, बंधुभाव, प्रेम, एकाग्रता आदी सद्गुणांचा संग्रह व दुर्गुणांचा नाश करण्याच्या संकल्पाचा हा गौरव आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात शील संवर्धन हे शिक्षकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे आपण भावी पिढीचे शिल्पकार आणि विद्यार्थी जीवनाचे आधारस्तंभ आहात. त्यामुळे आपण ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टि देण्याचे कार्य सदैव करत रहावे. असे प्रतिपादन नविन मुलींची शाळा संस्थेचे सचिव अ‍ॅड. एम. एल. भुरे यांनी केले. व पर्यवेक्षक कैलास कुरंजेकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२०च्या सिध्दांता विषयी मार्गदर्शन केले.

तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चारित्र्यावरप्रकाश टाकला. तिन्ही शाळेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच नविन मुलींची शाळा संस्थेचे सचिव अ‍ॅड. एम. एल. भुरे यांना ७५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व दहा रूपयांच्या ७५ नाण्यांचा हार घालून सत्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पा. वा. नवीन मुलींची शाळा, अरुणोदय बालक मंदिर व नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील ७५ शिक्षक – शिक्षिका व कर्मचारीवृंदांचा सन्मानपत्र व गुलाबाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मानसी कनोजे, मिनाक्षी मोटघरे यांनी केले व प्रास्ताविक नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा चित्रिव यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार साक्षी बाळबुध्दे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पा. वा. नवीन मुलींची शाळा, अरुणोदय बालक मंदिर व नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षिका व कर्मचारीवृंद तसेच नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील एएनसीसी कॅरेड, हरित सेना, स्काउट गाईड व विद्याथीर्नींनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.