मोहाडी पंचायत समितीत लाखोंचा गैरव्यवहार

यशवंत थोटे मोहाडी : वर्ष २०२०-२१ मध्ये मोह- ाडी पंचायत समितीत प्रशासक राज असतांना १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून त्याचे पुरावे देखील असल्याचा आरोप आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांनी केला असून या कामांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वरिष्टांकडे केली आहे. सध्या मोहाडी पंचायत समितीचे या, ना त्या कारणाने वाभाडे काढले जात आहे, आता पुन्हा या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. मोहाडी पंचायत समिती प्रशासनाला माहिती अधिकारा अंतर्गत मागण्यात आलेल्या माहिती मधून भ्रष्टाचाराचे हे सत्य समोर आले असून मागितलेली पूर्ण माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. पूर्ण माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे, हे अतिशय निंदनीय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंचायत समिती मोहाडीच्या वर्ष २०२०-२१ च्या नियोजनानुसार या वर्षात अनेक प्रकारची कामे घेण्यात आली होती, ते कामे पूर्ण झाले असून त्यांचे बिल देखिल काढण्यात आले आहेत. मात्र वास्तविक पाहता थातुरमातुर कामे करून लाखोंचे बिलकाढण्यात आल्याचे लक्षात येते. कामाच्या नियोजनानुसार काम झालेले नाहीत.

ही सरासर शासनाची दिशाभूल व जनतेच्या पैशाची लूट आहे.आणि हे सर्व मनमर्जीपणा मोहाडी पंचायत समितीमध्ये प्रशासक असतांना करण्यात आले असून ही गोरगरीब जनतेची लूट आम्ही सहन करणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड वैभव चोपकर यांनी लोकहीत लक्षात घेऊन केले असून या कामांची चौकशी करण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांना केली आहे. यासाठी एक समिती गठीत करून याची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करून झालेल्या भ्रष्टाचाराची भरपाई दोषींकडून करावी, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करतांना मोका चौकशीच्या वेळी आम्हालाही बोलावण्यात यावे. दोषी असलेल्या सर्व अधिकाºयांची बदली ही जिल्ह्याबाहेर करण्यात यावी,पंचायत समिती स्तरावरून जिईएम पोर्टल वरून झालेल्या खरेदी मध्येही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यांनी विकत घेतलेल्या वस्तूंची किंमत बाजारात कमी असतानासुद्धा त्या वस्तू चढ्या दरात खरेदी करण्यात आलेल्या आहेत. तरी त्या वस्तू निकृष्ठ दर्जाच्या असल्याचा आरोप होत आहे, वरील मागण्या येत्या एक आठवड्यात पूर्ण झाल्या नाही तर आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने आंदोलनाचा इशाराही कॉम्रेड वैभव चोपकर यांनी दिला आहे.

थातुरमातुर कामासाठी लाखोंचे बिल

प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र निहाय सहा ग्रामपंचायतींना अक्सिजन कान्स्ट्रेटर ५ लक्ष, ५३ हजार, ९१६ रुपये, सहा. गटविकास अधिकारी कक्षातील स्वच्छता गृह दुरुस्ती ३ लक्ष रु., स्लॅब गळती व इतर कामे ४ लक्ष रु., गोडाऊन जवळील सार्वजनिक स्वच्छता गृह दुरुस्ती ४ लक्ष रु., महिला कर्मचारी स्वच्छतागृह दुरुस्ती एक लक्ष रु., गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती कक्षातील स्वच्छतागृह दुरुस्ती ३ लक्ष रु., बी.आर.जी.एफ. सभागृहातील स्वच्छतागृह दुरुस्ती २ लक्ष रु, कृषी विभाग स्वच्छतागृह दुरुस्ती २ लक्ष, पं. स. भवनात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे ३ लक्ष, पं. स.च्या सर्व विभागात आरो मशीन लावणे ६ लक्ष रु, आपले सरकार सेवा केंद्रासाठी स्वतंत्र खोली, संगणक, लॅपटॉप इत्यादी वस्तू खरेदी ५ लक्ष, ७८ हजार, ३९९ रु., घरकुल डेमो खोली दुरुस्ती २ लक्ष रु., पंचायत समिती हॉल मधे पार्टेशन, फर्निचर व विद्युतीकरण ७ लक्ष १० हजार रुपये असे अनेक कामासाठी एकूण ६४ लक्ष, ८३ हजार ९८८ रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप वैभव चोपकर यांनी केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *