आॅनलाईन खरेदीतून होऊ शकतो फसवणुकीचा धोका

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : दिवाळीचा सण तोंडावर आला असून, अनेक लोक खरेदीचा बेत आखत आहेत. ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे फेकणे सुरू झाले आहे. आॅफरच्या नावाखाली एखादी लिंक ओपन केल्यास एका झटक्यात बँक खाते खाली होऊ शकते. त्यामुळे आॅनलाइन खरेदीतून फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस आॅनलाइन वस्तू खरेदी करण्याचे फॅड वाढत आहे. बाजारपेठेत जाण्यापेक्षा एका क्लिकवर मिळणाºया वस्तूंवर ग्राहक भाळत आहेत. ग्राहकांच्या या मानसिकतेचा फायदा आॅनलाइन फ्रॉडर्सकडून घेतला जात आहे. सध्या खरेदीसाठी आकर्षित केले जात आहे. अलीकडे मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागातही मोबाईल वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने तिथेही आॅनलाइन खरेदी मोठ्याप्रमाणात केली जात आहे. ग्राहकांभोवती आॅफरचे जाळे दिवाळीच्या तोंडावर फेकले जाणार आहे. मोबाईलवर आलेली लिंक ओपन केल्यास चक्क आपल्या खात्यात असलेले पैसे अवघ्या काही मिनिटांत उडवले जाऊ शकते. अशी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी कोणत्याहीलिंकवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. स्थानिक व्यावसायिक संकटातआॅनलाइन खरेदीचे व्यवहार वाढत असल्याने स्थानिक लहान, मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक लाखो रुपयांच्या माल दुकानात भरतात. मात्र, ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद बाजारपेठेत दिसत नाही. हा स्थानिक व्यावसायिकांचा अनुभव आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *